...तर गोव्यातही ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:26 PM2021-07-14T17:26:54+5:302021-07-14T17:28:00+5:30

'दिल्लीत लोकांना मोफत वीज मिळू शकते तर गोव्यात का नाही? गोव्यात अतिरिक्त वीज आहे. परंतु वहन आणि वितरण व्यवस्था सदोष आहे. ती सुधारून अखंडित चोवीस तास वीज पुरवठा केला जाईल.

If Aam Aadmi Party comes to power in the Assembly elections in Goa will provide free electricity up to 300 units says Arvind Kejriwal | ...तर गोव्यातही ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा 

...तर गोव्यातही ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा 

Next

पणजी - गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास लोकांना महिना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. भरमसाठ रक्कमेची जुनी बिले माफ केली जातील, चोवीस तास अखंडित वीज पुरवठा केला जाईल तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, अशा घोषणा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पुढील महिन्यात आपण पुन्हा गोवा भेटीवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (If Aam Aadmi Party comes to power in the Assembly elections in Goa will provide free electricity up to 300 units says Arvind Kejriwal)

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, 'दिल्लीत लोकांना मोफत वीज मिळू शकते तर गोव्यात का नाही? गोव्यात अतिरिक्त वीज आहे. परंतु वहन आणि वितरण व्यवस्था सदोष आहे. ती सुधारून अखंडित चोवीस तास वीज पुरवठा केला जाईल. दिल्लीत आज ७३ टक्के लोक मोफत विजेचा लाभ घेत आहेत. आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास गोव्यात ८७ टक्के लोकांना मोफत वीज मिळेल.

पक्षांतराबाबत केजरीवालांनी चीड व्यक्त केली. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांचा त्यांनी समाचार घेतला. केजरीवाल म्हणाले, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी काँग्रेसला १७ जागा देऊन सरकार स्थापनेसाठी कौल दिला होता परंतु दुर्दैव असे की, काँग्रेस सरकार स्थापन करू शकले नाही. भाजपला लोकांनी विरोधात कौल देऊन केवळ १३ जागा दिल्या होत्या. आज भाजपकडे २८ आमदार झाले आहेत आणि काँग्रेसकडे केवळ ५आमदार शिल्लक राहिले आहेत. लोकांची कामे करण्यासाठीच काँग्रेसमधून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दहा फुटीर आमदार सांगतात. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे असे म्हणणे आहे की, या आमदारांनी त्यांची कोणतीच कामे केलेली नाहीत आणि विकासही केलेला नाही. या आमदारांनी स्वार्थ तेवढा पाहिला आणि स्वतःचाच विकास केला, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली. 
 

Web Title: If Aam Aadmi Party comes to power in the Assembly elections in Goa will provide free electricity up to 300 units says Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app