'मी भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होतो', उपसभापतींचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 19:47 IST2019-07-25T19:41:18+5:302019-07-25T19:47:08+5:30
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मंत्री झालो नाही.

'मी भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होतो', उपसभापतींचा गौप्यस्फोट
पणजी : भाजप सरकार पाडण्यासाठी हालचाली मीही करीत होतो, असे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आणि आता गोवा विधानसभेचे उपसभापती बनलेले इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत सांगितले. काँग्रेसमधून जे १० आमदार भाजपात दाखल झाले होते, त्यात फर्नांडीस यांचा समावेश होता. गुरूवारी विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यांना उपसभापतीच्या पदावर बसविण्यात आल्यानंतर सभागृहाच्या सदस्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ते विरोधात असताना सरकार पाडण्यासाठी नियोजन करीत होते असे सांगितले.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मंत्री झालो नाही. एकदा तर अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो, परंतु तेव्हाही मंत्री बनू शकलो नाही. मुख्यमंत्री बनलेले सर्वजण त्यापूर्वी केव्हा तरी आपल्या घरी येवून गेलेले होते. परंतु, मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी आपल्याला मंत्री केले नाही. तुमचे नाव शेवटच्या क्षणी यादीतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सरकारातही आपल्याला मंत्री बनविण्यात आले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ढवळीकरांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता.