शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गोव्याचा मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही - विनय तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 4:42 PM

मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात ठेवलेली नाही व मी त्यादृष्टीने प्रयत्नही केला नाही. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पणजी : मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात ठेवलेली नाही व मी त्यादृष्टीने प्रयत्नही केला नाही. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने आणि त्यांचा बहुतांशवेळ इस्पितळातच जात असल्याने मुख्यमंत्री तात्पुरता तरी बदलावा व खासदार तेंडुलकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवावी असा विचार भाजपामध्ये चर्चेत असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने घेतलेल्या मुलाखतीवेळी तेंडुलकर यांनी सांगितले, की माझ्या नावाची चर्चा भाजपमाध्ये मुळीच सुरू नाही. मी बाहेरून अफवा ऐकत नाही. मी राज्यसभा खासदार म्हणून समाधानी आहे. शिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आहे. मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही. गोव्यात सरकारमध्ये नेतृत्व बदलाचाही विषय नाही. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येत नाही.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी तुमच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार झाला होता काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की शहा यांच्यासोबतच्या बैठकीत माझ्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर हेही सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर पक्षाचे तीन केंद्रीय निरीक्षकही बैठकीस आले होते. आम्ही गोव्यातील सगळी राजकीय माहिती शहा यांच्यासमोर ठेवली. शहा यांना गोव्यातील सगळी वस्तूस्थिती कळून आली आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, पण मी मुख्यमंत्री व्हावे असा विषय मुळीच नाही. बैठकीत तशी कोणतीच चर्चा झालेली नाही. त्या निव्वळ अफवा आहेत.

तुम्ही दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटला का असे विचारले असता, तेंडुलकर म्हणाले की मी भेटलो नाही. भाजपाचे गोवा प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे मनोहर पर्रीकर यांना इस्पितळात भेटले. मनोहर पर्रीकर हेच सत्ताधारी आघाडीचे नेते आहेत व त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद राहील. 

टॅग्स :goaगोवा