शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात तीन पर्यटकांचा मृत्यू; नाल्यात कार कोसळून भीषण अपघात

By काशिराम म्हांबरे | Updated: December 2, 2023 11:20 IST

उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे.

काशिराम म्हांबरे म्हापसा : हडफडे येथेशनिवारी पहाटे दोन वाहना दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तिघा पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक विदेशी पर्यटक गंभीररित्या जखमी झाला आहे. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना पहाटे ३.३० च्या दरम्यान हडफडे येथील रशियन क्लबजवळ घडली. मृत्यू झालेल्या पर्यटकात महेश शर्मा( नाशिक , महाराष्ट्र)  दिलीप कुमार  ( हैद्रबाद) तसेच मनोज कुमार ( हैद्रबाद ) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या आंतोन बिचकोव्ह ( रशीया) याला उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे.

हैद्राबाद तसेच नाशिक येथील पाच मित्र मिळून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. काल हे सर्व मित्र  हडफडे येथील एका रेस्टॉरंटात गेले होते. तेथून  पहाटे३.३० च्या दरम्यान  बाहेर पडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करुन ठेवण्यात आलेल्या गाडीत बसण्याच्या तयारीत असताना हा अपघात घडला. हे सर्व पर्यटक ज्या गाडीतून आले होते त्या गाडीतील पुढच्या सीटवर चालक  तसेच  एकजण बसला होता तर इतर तिघेजण मागच्या सीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडला असताना  मागून भरधाव  वेगाने आलेल्या दुसºया गाडीनेत्या पर्यटकांच्या गाडीला जोरदार धडक दिली.  दिलेली  धडक  एवढी जबरदस्त होती की मागच्या सीटवर बसण्याच्या प्रयत्नात असलेले तिघेही जण जागीच ठार झाले. धडक दिलेले वाहन विदेशी पर्यटक चालवत होता तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या धडकेनंतर तो विदेशी चालक आपल्या वाहनासहित रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळला.

अपघातात दोन्ही वाहनांची बरीच नुकसानी झाली आहेमृतांचे मृतदेह हणजूण पोलिसांनी ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून दिले आहेत. या पर्यटकांसोबत असलेल्या इतर दोघांची जबानी पोलिसांनी नोंद करुन घेतली आहे. रशीयन चालकावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक साहील  वारंग करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातcarकारNashikनाशिकPoliceपोलिस