होबळेंची आव्हान याचिका फेटाळली

By Admin | Updated: July 2, 2015 01:34 IST2015-07-02T01:34:39+5:302015-07-02T01:34:47+5:30

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट पाडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशास आव्हान देणारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांची याचिका

Hobbes challenge challenging plea rejected | होबळेंची आव्हान याचिका फेटाळली

होबळेंची आव्हान याचिका फेटाळली

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट पाडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशास आव्हान देणारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सीआरझेड उल्लंघनाचा ठपका या बांधकामावर असून हरित लवादाने २0 लाख रुपये दंडही ठोठावलेला आहे.
न्यायमूर्ती एफ. एम. रेईश व न्यायमूर्ती के. एल. वधाने यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लवादाने बांधकाम पाडण्याचा दिलेला आदेश, तसेच २0 लाखांचा ठोठावलेला दंड न्यायाला धरून नसल्याचा दावा होबळे यांनी हायकोर्टात केला होता व या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी होती. होबळे यांच्या वकिलाने या सुनावणीत युक्तिवाद करताना सर्व्हे क्रमांक १/१0 मध्ये असलेल्या वास्तूबाबत कोणताही बेकायदेशीरपणा नसताना तेथील व्यवसायही बंद पाडल्याने आपल्या अशिलास आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे म्हटले होते. २0 लाखांचा दंड अन्याय्य असून तो भरण्यास अशील असमर्थ असल्याचे होबळे यांच्या वकिलाने म्हटले होते. त्याला आक्षेप
घेताना आयरिश यांनी होबळे यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि मर्सिडीझ बेन्झसारखी महागडी कार त्यांच्याकडे आहे, असा दावा केला होता.
होबळे यांच्या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या बाबतीत पर्यावरणाचा विनाश तसेच सीआरझेडचे उल्लंघन झालेले असल्याने ते पाडण्याचा तसेच पर्यावरण हानीबद्दल सहा महिन्यांच्या आत २0 लाख रुपये दंड भरण्याचा आदेश लवादाने दिलेला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Hobbes challenge challenging plea rejected