हिस्ट्रीशीटर सूर्या कांबळीवर प्राणघातक हल्ला, आयसीयूत केले दाखल, हल्लेखोरांचा शोध सुरू
By वासुदेव.पागी | Updated: December 12, 2023 15:24 IST2023-12-12T15:24:21+5:302023-12-12T15:24:43+5:30
Goa Crime News: गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला सूर्यकांत कांबळी ऊर्फ सूर्या याच्यावर सोमवारी रात्री करंझळे येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले आहे.

हिस्ट्रीशीटर सूर्या कांबळीवर प्राणघातक हल्ला, आयसीयूत केले दाखल, हल्लेखोरांचा शोध सुरू
- वासुदेव पागी
पणजी - गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला सूर्यकांत कांबळी ऊर्फ सूर्या याच्यावर सोमवारी रात्री करंझळे येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले आहे. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी उशिरा घडली. तो घरी जात असताना त्याला अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्याच्याा शरिरावर धारधार शस्त्रांचे घाव आढळले असून बराच रक्तस्त्रावही झाला आहे. त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉत अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली.
सूर्या हा गुन्हेगारी कृत्यांसाठी ओळखला जातो. पेडणे, पणजी, डिचोली, कळंगूट आणि साळगाव पोलीस स्थाकात त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यात धमकी देणे, खुनी हल्ला करणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या या गैरकृत्यांमुळे अनेक गुन्हेगारांच्या हीटलीस्टवरही तो होता. अनेकांचा त्याच्यावर रागही होता. त्याच्यावरील सोमवारी झालेला हल्ला हा त्याचाच परिणाम असण्याची शक्यता पणजी पोलीस नाकारीत नाहीत. पणजी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान सर्राईत गुन्हेगारांनाच लक्ष्य करून खून करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. जुने गोवा पोलीस स्थानाच्या कार्यक्षेत्रात झालेला विशाल गोलतकर याचा खून ही अलिकडील घटना आहे. गोलतकर याचा खूनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळेच त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे नंतर तपासातून आढळून आले आहे. सूर्यावर हल्ला ही तसलाच प्रकार असण्याची शक्यता व्यत्त केली जात आहे.