शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

त्याने बारमध्ये नशेत दिली दरोड्याची कबुली!

By admin | Updated: February 26, 2015 02:27 IST

पणजी : दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये तर्रर्र झालेल्या एका ‘तळीरामा’ने साथिदाराशी बोलताना चक्क नुवे येथील राज गोम्स यांच्या

पणजी : दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये तर्रर्र झालेल्या एका ‘तळीरामा’ने साथिदाराशी बोलताना चक्क नुवे येथील राज गोम्स यांच्या घरावरील दरोडा आपण घातल्याचे सांगितले. इतर साथिदारांकडून दरोड्यातील वाटा न मिळाल्याने आपण संतप्त झालो असल्याचेही तो बरळला. योगायोगाने याच रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ही चर्चा ऐकली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवून नुवे दरोडा प्रकरण धसास लावले. चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार यांसारखे गुन्हे करून पसार झालेल्या अज्ञात गुन्हेगारांना पकडणे ही काही सोपी गोष्ट नसते; परंतु पोलीस आपले कसब पणाला लावून अनेक प्रकरणांचा पर्दाफाश करत आहेत. एखाद्या गाडीची केवळ क्रमांकपट्टी पाहून ती गाडी चोरीची आहे, हे ओळखून निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी कित्येक चोरीच्या गाड्या पकडल्या आहेत. नुवे येथे घरातील माणसांवर हल्ला करून दरोडा घालणारे गुन्हेगार अज्ञातच होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर दोघा व्यक्तींचे संभाषण पडले आणि हे संभाषणच ‘सुराग’ ठरले. या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक संशयित आणि त्याचा साथिदार दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये दारू ढोसत बसले होते. दारूच्या नशेत बोलता बोलता ते काय बोलताहेत, याचे भानही त्यांना राहिले नाही. नुवेत दरोडा घालताना मोठी जोखिम पत्करूनही आपल्याला अपेक्षित वाटा मिळाला नाही, असे एकाचे म्हणणे होते. वाटा मिळाला नाही, तर ‘त्या’ साथिदाराला सोडणार नाही, अशी भाषा तो बोलत होता. हे संभाषण त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर पडले आणि लगेच त्या अधिकाऱ्याने नुवे प्रकरणाचा तपास करीत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या घरफोड्याविरोधी पथकाला सतर्क केले. या पथकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी पुढील काम चोख बजावले. केवळ दोन दिवसांत राहुल ज्योतिबा जाधव आणि सिद्दिकी मोहम्मद सलीम या संशयितांना गजाआड करण्यात आले. या प्रकरणातील तिसरा व मुख्य संशयित सडा तुरुंगात होता. (प्रतिनिधी)