गोव्याला नववर्ष स्वागताचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 22:14 IST2019-12-21T22:13:27+5:302019-12-21T22:14:07+5:30
नाताळ आणि नववर्ष साजरे करणो अशा दुहेरी हेतूने येत्या आठवडय़ात गोव्यात देश- विदेशी पर्यटकांची गर्दी अनुभवास येईल.

गोव्याला नववर्ष स्वागताचे वेध
पणजी : राज्याला नव्या वर्षाचे (2020) स्वागत करण्यासाठीच्या सोहळ्य़ांचे वेध लागले आहे. किनारी भागात संगीत रजनी व मेजवान्यांचे आयोजन करण्याबाबतची तयारी सुरू आहे. नाताळ आणि नववर्ष साजरे करणो अशा दुहेरी हेतूने येत्या आठवडय़ात गोव्यात देश- विदेशी पर्यटकांची गर्दी अनुभवास येईल.
उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीतील हॉटेल व्यवसायिकांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात जास्त व्यवसाय प्राप्त होतो. येत्या 25 रोजी नाताळ सणाच्या काळात गोव्यात बरेच पर्यटक असतील. तसेच दि. 26 पासून मोठय़ा संख्येने पर्यटकांची गर्दी उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारी भागांत दिसून येईल. दि. 3क्, 31 डिसेंबर आणि दि. 1 जानेवारीला तर लाखो पर्यटक गोव्यात असतील. त्यावेळी सर्व हॉटेल्सच्या खोल्याही फुल्ल असतील असे काही व्यवसायिकांनी सांगितले. येत्या आठवडय़ात अनेक हॉटेलांकडून रात्री मेजवान्यांचे आयोजन केले जाईल.
पाटर्य़ाची तयारी सुरू आहे. शिवाय हॉटेल्स सजविण्याची, रोषणाई करण्याचीही कामे सुरू आहेत. यापूर्वीच्या तुलनेत यंदा पर्यटक गोव्यात कमी असले तरी, येत्या आठवडय़ात मात्र पर्यटकांच्या संख्येला पुरच येईल. 31 रोजीच्या रात्री किना:यांवर जाण्यासारखी स्थिती नसते. उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत 31 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच लाखो पर्यटकांची वाहने फिरतील. त्यावेळी वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून किनारी भागात काही रस्ते वन वे करण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हाधिका:यांनी तात्पुरत्या अधिसूचना जारी केल्या आहेत. दहा दिवसांसाठी काही रस्ते वन वे असतील. तसेच वाहनांना पार्किगसाठी तात्पुरत्या जागा निश्चीत करण्यात आल्या आहेत. देशातील काही राजकीय नेते, काही राज्यांचे मंत्री, काही निवृत्त न्यायाधीश, उद्योगपती व सिने कलावंत दि. 31 डिसेंबरला नवेवर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात असतील.