प्रशासनात आनंदीआनंद

By Admin | Updated: May 20, 2015 01:49 IST2015-05-20T01:49:33+5:302015-05-20T01:49:41+5:30

पणजी : मे महिन्यातील असह्य उकाडा, सुट्ट्या, पिकनिकची धूम या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनातील अनेक अधिकारीही सध्या रजेवर गेले आहेत.

Happiness in the administration | प्रशासनात आनंदीआनंद

प्रशासनात आनंदीआनंद

पणजी : मे महिन्यातील असह्य उकाडा, सुट्ट्या, पिकनिकची धूम या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनातील अनेक अधिकारीही सध्या रजेवर गेले आहेत. यामुळे प्रशासनात आनंदीआनंदच आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे पोर्टब्लेर येथे सुट्टी घालविण्यासाठी गेले आहेत. गोवा ते मुंबई, तिथून चेन्नई व चेन्नईहून पोर्टब्लेर असा प्रवास करत मुख्यमंत्री सहकुटुंब तिथे गेले आहेत. ते शनिवारी सकाळी परततील. अन्य काही मंत्रीही सध्या सुट्टीचा अनुभव घेत आहेत. अशावेळी विविध सरकारी खात्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजा टाकून सहलीवर जाणे पसंत केले आहे. सचिवालयात व मंत्रालयातही सध्या शुकशुकाट आहे. (खास प्रतिनिधी)
अनेक अधिकारीही रजेवर

 

Web Title: Happiness in the administration