लाचखोर आयटीआय इन्स्ट्रक्टर दोषी; न्यायालयाचा निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 08:44 PM2019-11-13T20:44:45+5:302019-11-13T20:44:50+5:30

विद्यार्थ्यांकडून लाच घेण्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आयटीआय इन्स्ट्रक्टर के हेन्री याला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

Guilty of bribery ITI instructor goa Court verdict | लाचखोर आयटीआय इन्स्ट्रक्टर दोषी; न्यायालयाचा निवाडा

लाचखोर आयटीआय इन्स्ट्रक्टर दोषी; न्यायालयाचा निवाडा

Next

पणजी: विद्यार्थ्यांकडून लाच घेण्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आयटीआय इन्स्ट्रक्टर के हेन्री याला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

आयटीआयमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दीड हजार रुपयांची लाच मागणारा तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणारा हा हेन्रर्री नामक इनस्ट्रक्ट्र पणजी येथील आयटीआयमध्ये फीटरच्या ट्रेडमध्ये शिकवित होता. तच्याविरुद्ध लाचखोरीच्या अनेक तक्रारी होत्या. भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून त्याच्यावर छापा टाकून त्याला रंगेहाथ पकडलेही होते. बरेच दिवस तुरुंगात काढल्यानंतर आरोग्याच्या कारणावरून त्याने सुटका करून घेतली होती. 

या प्रकरणात पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले राजन निगळ्ये यांनी तपास पूर्ण करताना  १४३ हून अधिक साक्षिदार मिळविले. तसेच  ८०० हून अधिक पानांचे आरोपपत्र बनविण्यात आले. सज्जड पुरावे उभे करण्यात आल्यामुळे न्यायालयीन लढाईत त्याचा गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस पक्ष यशस्वी ठरला. या प्रकरणात तत्कालीन उपअधिक्ष्रबोसुएट सिल्वा यांनी गुन्हा नोंदविला होता व नंतर निरीक्षक निगळ्ये यांच्यावर तपास काम सोपविण्यात आले होते. दोषीला अजून  शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. त्याला तूर्त कोलवाळ तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Web Title: Guilty of bribery ITI instructor goa Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.