‘मला पकडूनच दाखवा म्हणाऱ्याला पकडले; धार्मिक भावना दुखविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
By वासुदेव.पागी | Updated: October 5, 2023 18:06 IST2023-10-05T18:06:33+5:302023-10-05T18:06:47+5:30
इंस्टाग्राम वर वादग्रस्त पोस्ट टाकून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारा जाळ्यात सापडला आहे.

‘मला पकडूनच दाखवा म्हणाऱ्याला पकडले; धार्मिक भावना दुखविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
पणजी : इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट करून धार्मिक भावना दुखावणे आणि इतके करून न थांबता ‘मला पकडून दाखवा’ असे पोलिसांनाच आव्हान देण्याचे धाडस गोव्यातील येथील युवकास महागात पडले. कारण या आव्हानानंतर पोलसांनी त्याला पकडलेही आणि अटकही केली आहे.
इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट टाकून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारा जाळ्यात सापडला आहे. क्राईम ब्रँचने २७ वर्षीय साहील नाईक याला माशेल - फोंडा येथून अटक केली आहे. बुधवारी रात्रीच त्याला पकडले होते. परंतु नंतर उशिरा अटक केली. त्याने आपल्या कृत्यांची कबुली दिली आहे. आपल्या मोबाईलवरच इस्लाम धर्माविषयी आणि प्रेषित महम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो एडीट केला आणि नंतर तो मजकुरासह इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असे तपासातून आढळून आले आहे. या युवकाला मानसिक समस्या असल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गुरूवारी साहिलला पोलिसांकडून फोंडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे उपस्थित करून त्याच्यासाठी ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळविली आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मुस्लीम धर्मियांनी पोलीस स्थानका समोर निदर्शने केली होती, तसेच संशयिताला त्वरीत अटक करण्याची मागणी केली होती.