शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्ज फर्नाडिस यांच्या ‘त्या’ गाजलेल्या सभेची अजूनही गोवेकरांना आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:54 IST

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस म्हणजे मुलूख मैदानी तोफच. ते बोलू लागल्यावर ऐकणारा जनसमुदायाच्या अंगावर अक्षरश: काटा उभा रहायचा.

- सुशांत कुंकळयेकर 

मडगाव -  माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस म्हणजे मुलूख मैदानी तोफच. ते बोलू लागल्यावर ऐकणारा जनसमुदायाच्या अंगावर अक्षरश: काटा उभा रहायचा. 1987 साली गोवेकरांनीही हा अनुभव घेतला. मडगावात अगदी भर दुपारी उन्हाचा तडाखा असतानाही त्यांच्या या सभेला लोकांनी एवढी गर्दी केली होती की, मडगावचे लोहिया मैदान जनसमुदायाने भरुन ओसंडत होते. आजही मडगावकर त्या गाजलेल्या सभेची आठवण काढतात.  मडगावकरांना खूष करण्यासाठी त्यावेळी जॉर्ज फर्नाडिस  यांनी तब्बल दहा मिनिटे अस्सल मंगळुरी कोंकणी शैलीतून संवाद साधला होता.या बैठकीच्या आयोजकांपैकी एक असलेले अॅड. जगदीश प्रभूदेसाई हे आजही तेव्हाची ती घटना अगदी काल झाल्यासारखी स्पष्टपणो सांगतात. या सभेची पाश्र्र्वभूमी अशी की, राजीव गांधी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन व्ही. पी. सिंग त्यावेळी नुकतेच बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळी ‘जनमोर्चा’ नावाची राजकीय आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला जॉर्ज फर्नाडिस यांचाही खंदा पाठिंबा होता. याच दरम्यान, त्यांनी गोव्याचा दौरा आखला होता. मडगावात त्यांनी सभा घ्यावी यासाठी अॅड. प्रभूदेसाई, माजी आमदार कृष्णनाथ बाबुराव नाईक, त्यावेळी राजकीय चळवळीत सक्रीय असलेले तुळशीदास मळकण्रेकर हे सिंग यांच्याकडे गेले होते. मडगावात अगदी भर दुपारी त्यांची सभा ठेवली होती. वेळ दुपारची असूनही लोहिया मैदान तुडूंब भरले होते. या भरलेल्या मैदानावर लोकांशी संवाद साधताना, जॉर्ज यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करताना, आणिबाणीच्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या 80 वर्षाच्या आईवरही दबाव आणण्यास मागेपुढे पाहिले नाही असे वक्तव्य केले. प्रभुदेसाई म्हणतात, दुस:या दिवशी फर्नाडिस यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय वृत्तपत्रंवर हेडलाईन झाले होते.फर्नांडिस यांच्या साधेपणाबद्दल बोलताना प्रभुदेसाई म्हणाले, त्या सभेला सिंग व फर्नाडिस यांच्याबरोबर दत्ता सामंतही आले होते. या तिघांचीही रहाण्याची सोय मडगावच्या गोल्ड स्टार या हॉटेलात केली होती. ज्या दिवशी ही सभा होती नेमक्या त्याचवेळी हॉटेलची लिफ्ट बंद पडली. हे कळल्यावर पांढरा लेंगा आणि साधासा कुर्ता घालून सभेसाठी तयार झालेले फर्नाडिस हे जीन्यानेच फटाफट खाली उतरले आणि कुठलाही बडेजाव न दाखविता त्यांनी लोहिया मैदानची वाटही पकडली. कित्येक जणांच्या स्मरणातून आजही ही गाजलेली सभा गेलेली नाही.मूळ कोंकणी माणूस असल्याने गोव्याबद्दल काहीसे ममत्व असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांच्यामुळे गोवेकरांना कोंकण रेल्वेचाच फायदा झाला असे नव्हे तर फर्नाडिस यांच्यामुळेच दाबोळीच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला.माजी मुख्यमंत्री लुईङिान फालेरो हे अजुनही या घटनेची आठवण काढतात. ‘लोकमत’शी बोलताना फालेरो म्हणाले, 1997 साली मी गोव्याचा मुख्यमंत्री असताना फर्नाडिस केंद्रात संरक्षण मंत्री होते. दाबोळी विमानतळ हा लष्करी विमानतळ असल्याने त्यावर नागरी विमान वाहतुकीला कमी वेळ मिळायचा. यामुळे गोव्यातील पर्यटनावर विपरित परिणाम होईल हे मी फर्नाडिस यांना पटवून देवू शकलो. त्यांनी माझी मागणी मान्य करताना दाबोळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्याबरोबरच नागरी उड्डाणासाठी या विमानतळावर वेळही वाढवून दिला.फर्नाडिस हे मूळचे कामगार नेते असल्याने आणि मीही कामगार चळवळीतून पुढे आल्यामुळे या एका धाग्याने आम्हाला दोघांनाही बरेच जवळ आणले होते असे फालेरो म्हणाले. विमानतळा संदर्भात ज्यावेळी मी फर्नाडिस यांच्याशी बोलणी करण्यासाठी दिल्लीला जात होतो त्यावेळी माङो विमान दोन तास उशिरा धावत होते. याची कल्पना देण्यासाठी मी फर्नाडिस यांच्या कार्यालयात फोन केला त्यावेळी फर्नाडिस यांनी मला सांगितले की, तुमचे विमान उशिरा येणार याची मला माहिती आहे. तुम्ही काही काळजी करु नका. दिल्लीला पोहोचल्यावर थेट माङया कार्यालयात या. मी तुमची वाट पहातो, फालेरो यांनी सांगितले. एवढा साधा राजकारणी मी कधी पाहिला नाही असे ते म्हणाले.माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही फर्नाडिस यांच्या साधेपणाबद्दल बोलताना सांगितले, ते दिल्लीत संरक्षण मंत्री असताना मी गोव्यात शिष्टाचार मंत्री होतो. शिष्टाचार खात्याचा मंत्री या नात्याने ज्यावेळी फर्नाडिस गोव्यात यायचे त्यावेळी मी त्यांचे स्वागत करण्यासाठी जायचो. मात्र त्यांनी कधी संरक्षण मंत्र्याचा आब दाखविला नाही. विमानातून उतरताना ते  आपली बॅग स्वत: हातात घेऊन खाली उतरायचे.माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी फर्नाडिस यांच्या आठवणी जाग्या करताना, जॉर्जमुळेच गोवेकरांना कोंकण रेल्वे मिळाली. या रेल्वेचा गोव्यातील मार्ग निश्र्चित करताना मी संसदेत त्यांच्याकडे कित्येकदा भांडलोही. मात्र या भांडणाचा आमच्या वैयक्तिक संबंधावर कधी परिणाम झाला नाही असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव यांनीही फर्नाडिस यांच्या आठवणी जाग्या करताना, आपले त्यांच्याशी अगदी कौटुंबिक संबंध होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर केंद्रात त्यांना भेटायला गेलो त्यावेळी किमान एक वर्ष तरी मीच मुख्यमंत्रीपदी रहावे असा त्यांचा आग्रह होता. पण दिलेल्या शब्दाप्रमाणो मी 18 दिवसात मुख्यमंत्री पद सोडले. असे जरी असले तरी पुढच्या राजकीय कारकिर्दीत फर्नाडिस यांनी मला सतत मार्गदर्शन केले. शेवटर्पयत त्यांनी हे नाते सांभाळून ठेवले होते असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव हे मुख्यमंत्री असतानाच रेल्वे मंत्रीपद सांभाळणा:या जॉर्ज फर्नाडिस यांनी मडगावच्या रेल्वे उड्डाण पुलाची पायाभरणी केली होती.

 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसgoaगोवाPoliticsराजकारण