सरकार ड्रग्ज व्यवहार थांबविण्यास अपयशी हे पुन्हा उघड: गोवा फॉरवर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 11:41 IST2023-04-30T11:38:56+5:302023-04-30T11:41:19+5:30

हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्ज डिलरना अटक केली होती.

govt failure to stop drug trade exposed again criticised goa forward | सरकार ड्रग्ज व्यवहार थांबविण्यास अपयशी हे पुन्हा उघड: गोवा फॉरवर्ड

सरकार ड्रग्ज व्यवहार थांबविण्यास अपयशी हे पुन्हा उघड: गोवा फॉरवर्ड

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुंबई येथील केंद्रीय अमली पदार्थ विभाग पथकाने हरमल येथे धाड घालून मोठ्या प्रमाणावर चालणारे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील पोलिसांच्या नाकासमोर चालू असलेले व्यवहार कसे बिनबोभाट चालू आहेत, हे सिद्ध होते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.

यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्यात ड्रग कार्टेल चालू असून गोवा पोलिस त्याच्यावर कसलीच कारवाई करीत नाही, असे म्हटले. त्यांचा हा आरोप खरा असल्याचे या आजच्या गोष्टीवरून सिद्ध झाले आहे, असे कामत यांनी म्हटले आहे

यापूर्वी हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्ज डिलरना अटक केली होती. आता मुंबईच्या पोलिसांनी करवाई केली आहे. यावरून गोवा पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा स्पष्ट झाली. मुख्यमंत्र्यांकडे राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा या बेकायदेशीर व्यवहारातून त्यांना फायदा होत असावा. सरकारी आशीर्वाद असल्याशिवाय असे धंदे गोव्यात चालू राहणे शक्यच नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: govt failure to stop drug trade exposed again criticised goa forward

टॅग्स :goaगोवा