भोमप्रश्नी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:46 IST2025-04-23T11:46:03+5:302025-04-23T11:46:29+5:30

लोकांनी आधी काय चालले आहे हे समजून घ्यावे. जमिनीची आखणी केल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

govt doors open for land issue discussion said cm pramod sawant | भोमप्रश्नी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भोमप्रश्नी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी: भोम महामार्ग विस्तारासाठी चाललेली जमिनीची आखणी आधी ग्रामस्थांनी समजून घ्यावी. या प्रश्नावर चर्चेसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. भोम येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे हुज्जत घालून ग्रामस्थांनी कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. 

त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामस्थांनी आधी अधिकाऱ्यांना जमिनीची आखणी करून द्यावी. त्यानंतर त्यांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या आपल्यासमोर मांडण्यास ते मोकळे आहेत. सरकारने या बाबतीत नेहमीच चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवलेले आहेत. लोकांनी आधी काय चालले आहे हे समजून घ्यावे. जमिनीची आखणी केल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Web Title: govt doors open for land issue discussion said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.