गोव्यात सरकारी कार्यालयांना उद्या अर्धा दिवस सुट्टी; ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

By किशोर कुबल | Updated: October 25, 2023 13:38 IST2023-10-25T13:38:39+5:302023-10-25T13:38:48+5:30

वाहतूक कोंडी होऊ नये. तसेच अतिमहनीय व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दुपारनंतर कार्यालये बंद राहतील.

Government offices in Goa half day off tomorrow | गोव्यात सरकारी कार्यालयांना उद्या अर्धा दिवस सुट्टी; ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

गोव्यात सरकारी कार्यालयांना उद्या अर्धा दिवस सुट्टी; ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने गोव्यातील सर्व सरकारी कार्यालये उद्या गुरुवारी दुपारी १ नंतर बंद राहतील. सर्वसाधारण प्रशासन विभागाने हा आदेश काढला आहे. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते फातोर्डा, मडगांव स्टेडियमवर उद्घाटन होणार आहे. त्यामुळे प्रमुख रस्ते बंद असतील. वाहतूक कोंडी होऊ नये. तसेच अतिमहनीय व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दुपारनंतर कार्यालये बंद राहतील.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुमारे १२ हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. ६०० हून अधिक कलाकार उद्घाटनाला आपली कला पेश करणार आहेत.

Web Title: Government offices in Goa half day off tomorrow