शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सेझ प्रवर्तकांबरोबर सरकारचं सेटिंग; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:51 IST

प्रवर्तकांना व्याजासह पैसे परत करण्यास काँग्रेसचा विरोध 

पणजी : सेझ प्रवर्तकांना व्याजासह पैसे परत करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसने जोरदार विरोध केला असून हा तब्बल १२३ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, 'औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय चर्चेला न घेताच नंतरच्या बैठकीत इतिवृत्तात त्याचा समावेश करण्यात आला. संचालक मंडळाच्या ३५६ व्या आणि ३५७ व्या बैठकीतील एकूणच व्यवहार संशयास्पद आहेत. ३८ लाख चौरस मीटर जमीन सेझ प्रवर्तकांकडे अडकली आहे. या जमिनी सरकारने ताब्यात घेताना त्यांचे १३२ कोटी रुपये परत करण्यास हरकत नाही परंतु व्याज देणे संयुक्तीक नाही. व्याज देण्याच्या या एकूण व्यवहारात गौडबंगाल केलेले आहे.’सेझ प्रश्नी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गेल्या ३१ जुलै रोजी निवाडा दिला जाणार होता. परंतु त्याच्या तीन दिवस आधी २७ जुलै रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि सेझ प्रवर्तकांना व्याजासह पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसात कोर्टाचा निवाडा येणार हे माहीत असूनही घाईगडबडीत हा निर्णय घेण्याची काय गरज होती?, असा सवालही चोडणकर यांनी उपस्थित केला. प्रवर्तकांना सुलभ व्हावे म्हणून मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासण्यात आला. ७ पैकी ५ प्रवर्तकांनी जमिनी सरकारजमा करण्याचा निर्णय घेतल्याचे औद्योगिक विकास महामंडळाला कसे समजले? व्याजासह पैसे परत करण्याचा अधिकार महामंडळाला कोणी दिला? असे प्रश्नही चोडणकर यांनी विचारले. एकीकडे हे व्याज फेडण्यासाठी महामंडळाला गरज असेल तर कर्ज काढा, अशी सूचना करते तर दुसरीकडे महामंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन तिकलो हे सेझ प्रवर्तकांचे पैसे कायम ठेव म्हणून बँकेत ठेवले त्यातून जे व्याज मिळाले तो पैसा आम्ही प्रवर्तकांना व्याजासह त्यांचे पैसे परत करण्यासाठी वापरणार आहोत, असे सांगतात. यातील नेमके खरे काय? असा प्रश्नही चोडणकर यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, स्वाती केरकर, संकल्प आमोणकर आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाcongressकाँग्रेसgoaगोवा