साडेपाच कोटींची सरकारी उधळपट्टी

By Admin | Updated: February 4, 2015 02:36 IST2015-02-04T02:33:33+5:302015-02-04T02:36:18+5:30

पणजी : सरकारी उधळपट्टीचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. पाटो येथे कार्यालयासाठी म्हणून घेतलेल्या महागड्या

Government extravagance of 4.5pc | साडेपाच कोटींची सरकारी उधळपट्टी

साडेपाच कोटींची सरकारी उधळपट्टी

पणजी : सरकारी उधळपट्टीचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. पाटो येथे कार्यालयासाठी म्हणून घेतलेल्या महागड्या जागेचे तब्बल साडेपाच कोटी रुपये भाडे फेडले; परंतु वर्षभरात या जागेचा कोणताही वापर सरकारने केला नसल्याचे समाजकार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांना आरटीआय माहितीतून उघड झाले आहे.
कॉम्प्युटर डिलर नीलेश आमोणकर यांच्याकडून सरकारने ही जागा भाड्याने घेतली आहे. १ नोव्हेंबर २०१३ रोजी स्पेसीस या इमारतीतील ४८४१ चौरस मीटर आणि कामत टॉवर्समधील ६१३.२५ चौरस मीटर जागा महिना ४२ लाख ९२ हजार ९०४ रुपये भाड्याने घेण्यात आली. भाड्यात दरवर्षी ३.५ टक्के वाढ करण्याची तरतूदही करण्यात आली.
विशेष म्हणजे ज्या खासगी इमारतींमध्ये सरकारी कार्यालये आहेत, तेथे मालक पालिका कर भरतात. येथे आमोणकर यांचा हा बोजाही सरकारने उचलल्याचे निष्पन्न झाले आहे. आमोणकर हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निकटचे म्हणून सर्वज्ञात आहेत, असे आयरिश यांनी म्हटले असून या सर्व प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. पर्रीकर यांच्या निर्देशावरूनच २७ फेब्रुवारी २०१३ रोजी जागेसाठी इच्छाप्रस्ताव मागविणारी जाहिरात करण्यात आली. ६००० ते ७००० चौरस मीटर जागा सरकारला हवी होती. यासाठी दुसरा वैध प्रस्ताव मेसर्स प्रुडेन्शियल ग्रुपचे गौरांग सिनाय सुखटणकर यांचा होता. सुखटणकर हे आमोणकर यांचे नातेवाईक आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे.
दरम्यान, सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिवपद सांभाळलेल्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबर २०१३पर्यंत तरी या जागेचा ताबा घेतला नव्हता. नंतर आपली बदली झाल्याने पुढे काय झाले ते माहीत नाही.
(प्रतिनिधी)

Web Title: Government extravagance of 4.5pc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.