गोमंतकीय पत्रकारितेला लज्जास्पद!
By Admin | Updated: November 25, 2014 01:24 IST2014-11-25T01:24:14+5:302014-11-25T01:24:48+5:30
पणजी : एका वृत्तपत्राने कथित बदनामीसाठी दुसऱ्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्याचा प्रकार देशात विरळा आहे; पण तशी नोटीस गोव्यातील इंग्रजी हेराल्ड दैनिकाने ‘लोकमत’ला पाठवली आहे.

गोमंतकीय पत्रकारितेला लज्जास्पद!
पणजी : एका वृत्तपत्राने कथित बदनामीसाठी दुसऱ्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्याचा प्रकार देशात विरळा आहे; पण तशी नोटीस गोव्यातील इंग्रजी हेराल्ड दैनिकाने ‘लोकमत’ला पाठवली आहे.
हेराल्डने आपल्या एका महिला कर्मचाऱ्यास गरोदरपणाची हक्काची रजा दिली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू होती. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेकडेही (गुज) पत्रकारांनी त्याविषयी तक्रार केली होती. त्याबाबत लोकमतच्या ‘कुजबुज’ सदरात हकिकत छापून आली. कुजबुज छापून येताच हेराल्डचे संपादक सुजय गुप्ता यांनी लोकमतच्या संपादकांना फोन लावला व माफी मागण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लोकमतने हा प्रस्ताव झिडकारला होता. त्यानंतर अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस हेराल्डकडून पाठवली गेली आहे.
हेराल्डने आता नोटीस पाठविल्यानंतर लोकमतने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर यांना एकूण प्रकरणाविषयी विचारले असता, ते म्हणाले की, हेराल्डच्या संबंधित महिला कर्मचाऱ्याने अजून अधिकृतरीत्या लेखी तक्रार गुजकडे
केलेली नाही.