शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

गोव्याचा राहुल एव्हरेस्ट मोहिमेवर, मे महिन्यात अंतिम मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 8:27 PM

 प्रत्येक गिर्यारोहकाचे एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे स्वप्न असते.

मडगाव :  प्रत्येक गिर्यारोहकाचे एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे स्वप्न असते. गोव्यातील राहुल प्रभूदेसाई या 24 वर्षाच्या युवकानेही हेच स्वप्न बाळगले असून उद्या रविवार 18 मार्च रोजी तो या मोहिमेवर निघणार आहे. राहुल हा मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांचा मुलगा असून 29 हजार फुट उंचीवर असलेल्या एव्हरेस्टला गवसणी घालण्यास तो यशस्वी ठरला तर असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोमंतकीय गिर्यारोहक ठरणार आहे. यापूर्वी राहुलने 23,800 फुटावर असलेल्या धवलागिरी या शिखराला यशस्वी गवसणी घातलेली असल्यामुळे या एव्हरेस्ट मोहिमेकडेही तो विश्र्वासाने पहात आहे.

इंटरनॅशनल माऊन्टन गायडर्स या अमेरिकन ग्रुपबरोबर राहुल या मोहिमेवर जाणार असून शनिवारी गोव्याचे नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी त्याला निरोप दिला. यावेळी राहुलचे वडील दिलीप प्रभूदेसाई तसेच आई बबिता प्रभूदेसाई या उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, राहुलचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोमंतकीय ठरणार आहे. त्याला या मोहिमेसाठी 70 लाखावर खर्च येणार आहे. गोवा सरकारकडून जास्तीत जास्त मदत त्याला देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते त्यानुसार ही मदत दिली जाईल असे ते म्हणाले. राहुलची ही मोहीम गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.उद्या या मोहिमेवर रवाना होणारा राहुल पहिले दहा दिवस बेस कँपवर सराव करणार आहे. त्यानंतर 17 हजार फुटावरील कँपवर सुमारे  महिना, दीड महिना त्याचा सराव चालू रहाणार असून मेच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात एव्हरेस्टची खरी मोहिम सुरु होणार आहे. एव्हरेस्टवरचे वातावरण बेभरवंशाचे असते त्यामुळे आपली अंतिम मोहीम सर्वस्वी त्यावेळच्या हवामानावरच अवलंबुन असेल असे राहुल म्हणाला.

गेली वर्षभर राहुल या मोहिमेची तयारी करत असून यापूर्वी एव्हरेस्ट सर  करणारे पुण्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक किशोर धागुंडे यांच्याकडून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. त्याशिवाय हिवाळ्यात एक महिना लडाखलाही त्याने सराव केला आहे. मागचे वर्षभर गोव्यात या मोहिमेसाठी सराव करताना दरदिवशी सकाळी तीन ते चार तास आपण सराव करत होतो असे राहुलने सांगितले. त्यात 40 ते 45 कि.मी. अंतर धावणो त्याशिवाय 20 किलोचे वजन पाठीवर घेऊन मडगावजवळ असलेल्या चंद्रनाथ पर्वतावर पर्वतारोहण करत होतो असे त्याने सांगितले. आपल्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच एव्हरेस्टचे हे स्वप्न मी बघू शकलो. एव्हरेस्ट सर करुन आल्यास अन्य गिर्यारोहक तयार करण्यावर आपण भर देणार असे तो म्हणाला.