शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

गोव्यात पर्यटकांकडून फुटपाथवर स्वयंपाक, स्थानिकांचा जोरदार आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 19:20 IST

गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा सरकार जगभरात जाहिरात आणि रोड शो करत असले तरी, प्रत्यक्षात अजुनही अगदी किरकोळ खर्च करणारे पर्यटक गोव्यात जास्त संख्येने येत असल्याचे आढळून येते.

पणजी- गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा सरकार जगभरात जाहिरात आणि रोड शो करत असले तरी, प्रत्यक्षात अजुनही अगदी किरकोळ खर्च करणारे पर्यटक गोव्यात जास्त संख्येने येत असल्याचे आढळून येते. रविवारी तर पणजी व परिसरातील भागांमध्ये फुटपाथवर स्वयंपाक करताना अनेक पर्यटक आढळले. स्थानिकांनी अशा पर्यटकांना आक्षेप घेतला आहे.पणजी व परिसरात सरकारने इफ्फीनिमित्ताने फुटपाथ अगदी स्वच्छ व दुरुस्त केले आहेत. अनेक ठिकाणी चांगल्या टाईल्स घातल्या आहेत. देशी पर्यटक आपल्या बसगाड्या व अन्य वाहने रस्त्याच्याबाजूने उभ्या करतात व या फुटपाथवर थेट शेगडी ठेवून स्वयंपाक करतात असे रविवारी स्थानिकांना आढळून आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा पर्यटकांचे फोटोही सोशल साईटवर टाकले आहेत आणि गोव्यातील पर्यटन व्यवसायाची हीच का ती चांगली सुरूवात असे प्रश्न विचारले आहेत. पदपथांवर रांगेत पर्यटकांनी जेवण तयार करण्याची भांडी ठेवली असल्याचेही आढळून आले. 

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर तर अशा पर्यटकांच्या सध्या रांगा लागल्या आहेत. वाहने उभी करून वाहनांच्या मागे आडोशाला स्वयंपाक तयार केला जातो. तिथेच जेवण केले जाते. मग तिथेच सगळा कचरा व शिल्लक अन्न पदार्थ टाकून दिले जातात. हीच स्थिती काही प्रमाणात वागातोर, बागा, कांदोळी, सिकेरीच्या पट्टय़ात दिसून येते. पर्यटकांना उघडय़ावर मद्यपान तसेच उघडय़ावर स्वयंपाक करू दिला जाणार नाही, असे दोन महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. काही सामाजिक कार्यकत्र्यानी अशा पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक दिसतील अशा पद्धतीनेही वाहनांचे फोटो काढून ते फोटो सरकारच्या पर्यटन खात्याला पाठवले आहेत. काही पर्यटक पदपथांवर नव्हे तर किनाऱ्यांवर बसून तिथेच स्वयंपाक करत आहेत. गोव्यात येतानाच ते मोठ्या प्रमाणात भांडी व कडधान्य घेऊन येतात. गोव्यात सध्या फिश फेस्टीव्हल सुरू आहे. त्यानिमित्तानेही पर्यटकांची वर्दळ पणजी-कांपाल-मिरामार-दोनापावल या पट्टय़ात वाढली आहे. राज्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. करंजाळेच्या किनारपट्टीत पर्यटक उघडय़ावर मद्यप्राशन करताना आढळून येत आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी रविवारी अंजुना येथील किनारपट्टीत छापा टाकला व बेन शोशेन योसफ या विदेशी पर्यटकाला 80 ग्रॅम चरस बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.