सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ऑर्गेनिक राज्य करण्याचे लक्ष्य - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:41 IST2018-10-31T17:40:56+5:302018-10-31T17:41:38+5:30

ऑर्गेनिक शेती हा सध्या जगभरात परवलीचा शब्द झालेला असताना सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ‘ऑर्गेनिक’ करण्यासाठी राज्यातील कृषी खात्याने पावले उचलली आहेत.

Goal to make Goa a Organic state |  सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ऑर्गेनिक राज्य करण्याचे लक्ष्य - विजय सरदेसाई

 सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ऑर्गेनिक राज्य करण्याचे लक्ष्य - विजय सरदेसाई

 मडगाव - ऑर्गेनिक शेती हा सध्या जगभरात परवलीचा शब्द झालेला असताना सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ‘ऑर्गेनिक’ करण्यासाठी राज्यातील कृषी खात्याने पावले उचलली आहेत. ऑर्गेनिक शेतीसाठी गोव्यात ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीनेही गोवा सरकारने इच्छुक कंपन्यांकडून बोली मागविल्या आहेत. गोव्यातील सरकारी कृषी फार्मात हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी ‘ऑर्गेनिक शेती’ संदर्भात जागृती करण्यासाठी मडगावात आयोजीत केलेल्या मेळाव्यात ही माहिती दिली. गोव्यातील शेतीची जोड पर्यटन व्यवसायाशी घालून गोव्याच्या ऑर्गेनिक उत्पादनांचे जगभरात ब्रँडींग करण्यावरही सरकार भर देणार आहे. उच्च दर्जाचे पर्यटक गोव्याकडे आकृष्ट व्हावेत यासाठी ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करण्याची योजना त्यांनी बोलून दाखवली. 

सरदेसाई म्हणाले, कृषी खात्याकडे असलेल्या कोडार किंवा एला फार्ममध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रातून उत्कृष्ट दर्जाची ऑर्गेनिक शेती उत्पादने तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. या शेतीत जर कोणी गुंतवणूक करण्यास पुढे येत असेल तर सरकार त्याला मदत करण्याबरोबरच त्याच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठीही सहाय्य करेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी गोवा कृषी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रेदो तसेच दक्षिण गोव्यातील उपसंचालक नेवील आफोन्सो यांच्यासह शिरोडय़ातील शेती व्यवसायीक असलेले अकबर मुल्ला हे उपस्थित होते.

Web Title: Goal to make Goa a Organic state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.