शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिव्यांद्वारे मासेमारीच्या प्रश्नावर गोव्याची ताठर भूमिका, पंतप्रधानांना पत्र पाठवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:59 IST

एलईडी दिव्यांचा वापर करून होणा-या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी गोवा सरकार सज्ज आहे. पण त्यासाठी गोव्याला शेजारी कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केरळ सरकारचीही मदत हवी आहे.

पणजी  : एलईडी दिव्यांचा वापर करून होणा-या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी गोवा सरकार सज्ज आहे. पण त्यासाठी गोव्याला शेजारी कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केरळ सरकारचीही मदत हवी आहे. याबाबतीत  गोव्याचे मच्छीमारीमंत्री विनोद पालयेकर यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी  पत्रव्यवहार  करणार  असल्याचे  स्पष्ट केले  आहे.

गोव्यात नुकत्याच झालेल्या बैठकीस  महाराष्ट्र, कर्नाटक, केरळचे मच्छीमारी अधिकारी तसेच मच्छिमार बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री पालेकर यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, १२ सागरी मैल अंतराच्या आतही  एलईडी दिव्यांनी मासेमारी होत आहे. शेजारी महाराष्ट्र-कर्नाटकातील ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत अतिक्रमण करून येथे समुद्रात स्वैर मासेमारी करीत आहेत. या ट्रॉलरमालकांना आवरले पाहिजे. 2048 पर्यंत समुद्रातील मत्स्य बीज नष्ट होणार असून त्याआधी  मासेमारीवर निर्बंध  घालणे आवश्यक आहे.

पालयेकर  ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे  मंत्री आहेत तो पक्ष सरकारात मित्रपक्ष असून गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात या पक्षाने पारंपरिक मच्छीमारांचा हिताचे काही मुद्दे मांडून मच्छीमारांच्या कल्याणार्थ आश्वासने दिली होती. या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पक्षाचे मंत्री आता कटिबद्ध झाले आहेत. 

गोव्यात सुमारे १२00 ट्रॉलर्स असून गोव्याचे काही ट्रॉलर्सही बुल ट्रॉलिंग करतात. अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठे मासे पकडून आणतात तसेच एलईडी  दिव्यांव्दारे मच्छीमारी करतात. 

पारंपरिक मच्छीमारांचे हित जपण्यासाठी १९८0 च्या  मरिन रेग्युलेशन कायद्यातही बदल करण्याची तयारी गोवा सरकारने चालवली आहे 

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मंत्री पालयेकर यांनी एलईडीच्या प्रश्नावर कर्नाटकची भूमिका तळ्यात मळ्यात तर केरळची भूमिका एलईडी नकोच अशी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या भूमिकेबद्दल अस्पष्टता असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा