Goa: गोव्यात अखेर पर्यटन खुले, कॅसिनो उद्यापासून ५0 टक्के क्षमतेने उघडणार, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सबरील निर्बंधही शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 00:16 IST2021-09-20T00:15:39+5:302021-09-20T00:16:04+5:30
Goa News: गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील.

Goa: गोव्यात अखेर पर्यटन खुले, कॅसिनो उद्यापासून ५0 टक्के क्षमतेने उघडणार, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सबरील निर्बंधही शिथिल
पणजी : गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील. जलसफरी करणाºया बोटी, वॉटर पार्क निम्म्या उपस्थितीने खुले करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण खात्याच्या स्वतंत्र एसओपीने विद्यालयेही कालांतराने खुली केली जाणार आहेत. (Tourism finally open in Goa, casinos to open at 50 per cent capacity from tomorrow, restrictions on spas, massage parlors, nightclubs eased)
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी हा आदेश काढला. कॅसिनो तसेच स्पा, मसाज पार्लरांवर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कि ंवा प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआर दाखला घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. दुसरा डोस किमान १५ दिवस आधी घेतलेला असावा. मास्क परिधान करणे, सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंग तसेच कोविडची इतर मार्गदर्शक तत्त्वें पाळणे सक्तीचे आहे.आॅडिटोरियम, कम्युनिटी हॉल, सिनेमागृहांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने बसविता येणार नाही.
मार्चमध्ये कोविडची दुसरी लाट आल्यापासून गेले सहा महिने कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा, बंदच होते. दरम्यान, काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केरळमधून येणाºया प्रवाशांना (विद्यार्थी तसेच कर्मचारी वगळता) आरटीपीसीआर निगेटिव्ह दाखला सक्तीचा असून ५ दिवस घरी विलगीकरणात राहणेही सक्तीचे आहे.
टीटीएजीकडून स्वागत
पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की,‘ कॅसिनो, जलसफरी करणाºया बोटी, मसाज पार्लर आदी चालू करण्याची गरज होती. कॅसिनोंमध्ये येणाºया ग्राहकांमुळे शहरातील दुकानांना तसेच हॉटेलना व टॅक्सी व्यावसायिकांनाही लाभ होतो. पर्यटनावर निर्बंधांमुळे हॉटेलांमधील आॅक्युपन्सी कमीच होती. दोन आणि तीन तारांकित हॉटेलांमध्ये २0 टक्केही खोल्या भरलेल्या नसत. केवळ विकेंडला काय ते पर्यटक येत असत. आता सरकारने निर्बंध शिथिल केल्यास हॉटेल आॅक्युपन्सी ५0 टक्क्यांच्याही वर जाईल.
शहा म्हणाले की,‘ सध्या दाबोळी विमानतळावर दिवसाकाठी ५५ ते ६0 विमानफेºया होतात. निर्बंध काढल्यानंतर आणखी १५ ते २0 विमानफेºया वाढतील. काही महिन्यांनी हे प्रमाण दिवशी ९0 ते १00 पर्यंत पोहचू शकते. महामारी येण्याआधी रोज ८0 विमाने गोव्यात यायची.
दरम्यान, सरकारने वाढवलेले पर्यटन शुल्क तसेच अबकारी करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेने सरकार दरबारी केली आहे.