शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 7:29 PM

राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला.

पणजी : राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पोलिस, टॅक्सी व्यवसायिक व इतरांकडून पर्यटकांचा छळ केला जातो. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना तर पर्यटनातील काही कळतच नाही, अशा शब्दांत टुर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनच्या काही सदस्यांनी टीका सोडले.

संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसायस, माजी अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा, ज्ॉक सुखिजा, श्री. धोंड, थॉमस कुकचे अनस डायस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार दरवर्षी गोव्यात पर्यटकांची संख्या खूपच मोठी सांगत आहे. प्रत्यक्षात आमचा त्या आकडेवारीवर मुळीच विश्वास नाही. सरकारने आमच्यासोबत संयुक्तपणो डिसेंबर महिन्यात सव्रेक्षण करून घ्यावे. मग खरी आकडेवारी कळेल, असे सावियो मेसायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे 2क्17 च्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करत होते तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो. खाण धंदा बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय तरी नीट चालावा म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती पर्यटन मंत्रीपदी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती व त्यांनी होकार दिला होता. नोटबंदी, जीएसटी अशा केंद्राच्या विविध निर्णयांनी गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रत मंदी आणली पण पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अजून एकदाही आम्हाला भेट दिलेली नाही. माविन गुदिन्हो व अन्य सगळे मंत्री मात्र आम्हाला भेटले. आजगावकर का भेटत नाहीत ते कळत नाही. त्यांना पर्यटनातील काही कळतही नाही, असे फ्रान्सिस ब्रागांझा म्हणाले. गोव्यात येणा:या पर्यटकांची गाडी अगोदर पोलिस अडवतात. पर्यटक म्हणजे जणू गुन्हेगारच आहे असे मानले जाते. 4क् टक्के पर्यटक संख्या कमी झाली आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. टॅक्सी व्यवसायिक व टॅक्सी चालकांविरुद्ध विदेशी पर्यटकांकडून आमच्याकडे दर आठवडय़ाला किमान दोन तरी तक्रारी येतात. त्यांच्याकडून लुबाडणूक केली जाते असे पर्यटक सांगतात. डिजीटल मीटर, अॅप सिस्टम वगैरे टॅक्सींसाठी सरकारने लवकर आणावी, अशी मागणी मेसायस यांनी केली.

विवाह सोहळेही अडतातजास्त खर्च न करणा:या तसेच पर्यावरणाविषयी काही देणोघेणो नसलेल्या व चांगले वर्तनही न करणा:या देशी पर्यटकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे ही गोष्ट चांगली नव्हे. त्यांच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करायला हवे. कळंगुटच्या पट्टय़ातील हॉटेल व्यवसायिक तर अशा पर्यटकांना कंटाळले आहेत. राज्यात नोंदणी न करता शेकडो छोटी हॉटेल्स चालवली जात आहेत. त्यांच्याकडून सरकारला काही महसुलही मिळत नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. गोव्यात मोठे विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी जीसीङोडएम, पंचायत व अन्य ब:याच यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. जीसीङोडएमची बैठक तर महिन्याला दोनचवेळा होते. परवानगीवीना विवाह सोहळे रद्द करावे लागतात. केरळमध्ये तर कोणतेच शूल्क व परवान्यांवीना विवाह सोहळे पार पडतात. असे मेसायस म्हणाले. 

गोव्यातील कचरा समस्या, वारंवार खोदले जाणारे रस्ते, अस्वच्छ किनारे या सगळ्य़ा समस्यांमुळे पर्यटक गोव्याला कंटाळतात. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम हे पर्यटन खात्याला जमत नाही, तरीही किनारपट्टी कंत्रटासाठी निविदा तेच खाते जारी करते. सन बर्न, सेरंडिपीटी आदी महोत्सव गोव्यात झाले तर जास्त पर्यटक येतात. मात्र विविध प्रकारच्या परवान्या व विविध प्रकारचे शूल्क महोत्सवाच्या आयोजकांना भरावे लागते. आम्ही तर म्हणतो की अशा महोत्सवांसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे मेसायस म्हणाले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन