लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा प्रदेश भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत काश्मीरची प्रगती मार्गी लागली ती थांबविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या राज्याच्या शत्रूनी तसेच अंतर्गत देशद्रोहींनी नागरिकांचे मनोबल खच्चीकरण केले आहे आणि चिथावणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.'
मोदी सरकारने कलम ३७० हटवून नागरिकांसह जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला मुख्य प्रवाहात आणण्यात आले. लोकशाही पुनर्संचयित झाली आणि केंद्रशासित प्रदेशाचा कारभार चालविण्यासाठी जनतेने निवडलेले सरकार स्थापन केले गेले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची भरभराट होत आहे. जात, पंथ आणि धर्माचा विचार न करता प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झाला, असेही ते म्हणाले.