गोवा विमानतळावर सव्वा कोटी रुपयांचं सोनं जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 19:08 IST2018-04-01T19:08:06+5:302018-04-01T19:08:06+5:30
शारजाहून ३.२२९ किलो म्हणजे १ कोटी रुपयांचे सोने घेऊन येत असताना विमानतळावर पकडला गेला.

गोवा विमानतळावर सव्वा कोटी रुपयांचं सोनं जप्त
पणजी : दाबोळी विमानतळावर चोरट्या मार्गाने विदेशातून येणारे सोने जप्त करण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारी गोमंतकीय प्रवासी शारजाहून ३.२२९ किलो म्हणजे १ कोटी रुपयांचे सोने घेऊन येत असताना केंद्रीय यंत्रणांकडून दाबोळी विमानतळावर पकडला गेला.
सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती महसूल इंटेलिजन्स संचालनालयाच्या अधिकाºयांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. या गोमंतकीय प्रवाशाची अगोदर बॅग तपासण्यात आली. त्यात त्यांना काही सापडले नाही. मात्र, त्याच्या अंगावर कमरेला बांधलेली जाड सोन्याची साखळी व चार सोन्याच्या कांड्या सापडल्या. हे सोने आपले नसून कोझिकोडा, केरळ येथील एका व्यक्तीने आपल्याकडे दिल्याचे चौकशीवेळी या प्रवाशाने सांगितले. हा केरळचा दुसरा प्रवासीही त्याच विमानाने आला होता. लगेच त्यालाही विमानतळावर पकडण्यात आले. त्याने गुन्हा कबूल केला असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली.