Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा

By समीर नाईक | Updated: October 12, 2023 17:04 IST2023-10-12T17:03:36+5:302023-10-12T17:04:24+5:30

Goa News:   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स ची पाहणी केली. 

Goa: Review of National Sports Tournament by Chief Minister | Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा

Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा

- समीर नाईक
पणजी -  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स ची पाहणी केली. 

यावेळी त्यांच्यासोबत  क्रीडा सचिव स्वेतीका सच्चेन, मुख्यमंत्र्याचे सचिव अजित रॉय आणि खेलो इंडिया सेंटरचे प्रमुख के. सुमित, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या  विविध ठिकाणांची पाहणी करण्यास आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्भूमीवर मुख्यमंत्र्यांनी कांपालयेथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स चीपाहणी केली. तसेच उर्वरित कामे पुढच्या दोन दिवसात पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी  केली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ताळगाव पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमची पाहणी केली होती. १९ रोजी पासून येथे बॅडमिंटनचे सामने होणार आहे. तेथील देखील जवळपास काम पूर्ण झाले आहे.

Web Title: Goa: Review of National Sports Tournament by Chief Minister