Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच
By किशोर कुबल | Updated: October 1, 2023 14:25 IST2023-10-01T14:25:10+5:302023-10-01T14:25:34+5:30
Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे.

Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच
- किशोर कुबल
पणजी - हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.
महाखाजन- धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. महामार्गाची एक लेन बंद वाहतुकीची मात्र कोंडी झाली.
हवामान वेधशाळेने ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहील, असा इशारा देताना काही ठिकाणी वाय्राचा वेग ताशी ६० किलोमिटरपर्यंत पोचू शकतो. राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असे म्हटले आहे. कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.