शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

तोतया मंत्र्याचा माग घेण्यासाठी गोवा पोलीस लखनौला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 15:19 IST

- सुशांत कुंकळयेकर मडगाव: उत्तर प्रदेशचा सहकार मंत्री अशी बतावणी करुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आजी—माजी मंत्र्यांना शेंडी ...

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: उत्तर प्रदेशचा सहकार मंत्री अशी बतावणी करुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आजी—माजी मंत्र्यांना शेंडी  लावणारा व त्यामुळे सध्या पोलिसांचा पाहूणचार घेणाऱ्या लखनौच्या सुनिल कुमार सिंग (48) या तोतया मंत्र्याचे एक एक किस्से सध्या गोव्याच्या प्रसार माध्यमात गाजत असून या तोतयाचा आगा पिछा शोधून काढण्यासाठी गोवा क्राईम ब्रँचचे एक पथक सध्या लखनौला रवाना झाले आहे.

स्वत:ला उत्तर प्रदेशातील मंत्री म्हणणारा सुनिल सिंग क्रिसमसच्या मुहूर्तावर आपल्या अन्य तीन साथीदारांबरोबर गोव्यात आला होता. एका बनावट मेलद्वारे त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्याचा शाही पाहूणचार करण्यात आला होता. त्याच्या दिमतीला एक आलीशान गाडी आणि संरक्षणासाठी पोलीसही तैनात करण्यात आला होता.

गोव्यातील विविध सहकारी संस्थांना भेट देतानाच त्यांनी गोव्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे व माजी सहकार मंत्री प्रकाश वेळीप यांचीही भेट घेतली होती. प्रकाश वेळीप यांच्या सहकारी संस्थेला दहा कोटी रुपयांची मदत करण्याचेही त्याने जाहीर केले होते. या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी हा तोतया प्रमूख पाहुणा म्हणूनही उपस्थित राहिला होता.

दरम्यानच्या काळात दारुच्या नशेत असताना  आपल्याला मालिश करण्यासाठी मुली आणून द्या अशी मागणी सरकारी विश्रमधामाच्या अधिकाऱ्याकडे केल्यानंतर त्याचा संशय आल्याने इंटरनेटवर त्याची माहिती शोधून काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सुनिल कुमार सिंग नावाचा कुठलाही मंत्री उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात नाही हे दिसून आले होते. त्यानंतर गोवापोलिसांनी त्या चौघानाही चतुभरूज केले होते.

सध्या हे चारही तोतये क्राईम ब्रँचच्या कोठडीत आहेत. क्रिसमसच्या काळात  गोव्यात फुकट रहायला मिळावे यासाठीच या तोतयाने हा बनाव बनविला होता. मात्र त्यामुळे गोवा सरकारची संपूर्ण इज्जत जाऊन सगळीकडे शिथू झाले होते.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसArrestअटक