न्यूड पार्टीच्या चौकशीसाठी गोवा पोलिस दिल्लीच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:31 IST2019-09-23T19:30:22+5:302019-09-23T19:31:03+5:30

गोव्यातील आश्वे- मोरजीच्या पट्टय़ात न्यूड पार्टी होईल, अशी धक्कादायक जाहिरात कुणाकडून तरी केली जात आहे.

Goa police contacted Delhi to inquire about Nude party | न्यूड पार्टीच्या चौकशीसाठी गोवा पोलिस दिल्लीच्या संपर्कात

न्यूड पार्टीच्या चौकशीसाठी गोवा पोलिस दिल्लीच्या संपर्कात

पणजी : मोरजी- आश्वे येथे खरोखर न्यूड पार्टी आयोजित केली जाणार आहे का, याची चौकशी गोवा पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस यासाठी दिल्ली पोलिसांच्याही संपर्कात आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.


मुख्यमंत्री सध्या गोव्याबाहेर आहेत. ते आज मंगळवारी पुन्हा कार्यालयात येतील. गोव्यातील आश्वे- मोरजीच्या पट्टय़ात न्यूड पार्टी होईल, अशी धक्कादायक जाहिरात कुणाकडून तरी केली जात आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकाराची दखल घेतली व चौकशीचे आदेश दिले.


लोकमतशी सोमवारी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की कथित न्यूड पार्टी प्रकरणी सखोल चौकशी करा अशी सूचना आपण पोलिसांना केली आहे. गोवा पोलिस सध्या दिल्ली पोलिस यंत्रणोच्या संपर्कात आहेत. कारण न्यूड पार्टीची जाहिरात करताना अज्ञातांकडून एक मोबाईल क्रमांक दिला जात आहे. तो क्रमांक दिल्लीतील आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची मदत तपासासाठी घेतली जात आहे. सत्य काय ते कळून येईल.


दरम्यान, न्यूड पार्टीमध्ये देशी व विदेशी महिला सहभागी होतील अशी जाहिरात केली जात असून सोशल मिडियावर त्यामुळे चिड व्यक्त होत आहे. अनेक मान्यवर गोमंतकीयांनी आपला संताप व्यक्त केला व मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी केली. ही जाहिरातच खोटी असावी, अशी चर्चा देखील गोव्याच्या पर्यटन क्षेत्रत सुरू झाली आहे. कारण न्यूड पार्टी कोणत्या हॉटेलमध्ये होईल ते स्पष्ट केले गेलेले नाही. गोव्याचा पर्यटन हंगाम येत्या दि. 2 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. सोशल मिडियावर मात्र न्यूड पार्टीचीच चर्चा आहे.

Web Title: Goa police contacted Delhi to inquire about Nude party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा