Goa MLAs to meet Amit Shah | गोव्याच्या 'त्या' दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्र
गोव्याच्या 'त्या' दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्र

ठळक मुद्दे'तुम्ही चांगले काम करा, मग लोकही तुम्हाला साथ देतील'दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्रअमित शहा यांची गुरूवारी रात्री 11 वाजता दिल्लीत भेट

पणजी : तुम्ही चांगले काम करा, मग लोकही तुम्हाला साथ देतील असा कानमंत्र गोव्याच्या दहाही आमदारांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला. 

केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांची दहा आमदारांनी गुरूवारी रात्री 11 वाजता दिल्लीत भेट घेतली. काँग्रेसमधून हे दहा आमदार भाजपामध्ये आले आहेत. अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही लोकांची कामे करा, लोकांशी चांगले वागा, लोकांचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील, असे शहा यांनी सांगितले. ज्यावेळी दहा आमदार अमित शहा यांना भेटले, त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम उपस्थित होती. 

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे तीन मंत्री आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाले.  गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे भाजपाप्रणीत आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना डच्चू देण्याचे ठरले. चार नव्या आमदारांचा मंत्री म्हणून उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता शपथविधी  होणार आहे.


Web Title: Goa MLAs to meet Amit Shah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.