शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या आमदाराला एलईडी मासेमारीप्रकरणी ३ लाख रुपये दंड, मालवण तहसीलदारांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 17:12 IST

मालवणच्या गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी मालवणमध्ये हा ट्रॉलर पकडला होता.

पणजी - मालवणात बेकायदा एलईडी मासेमारी प्रकरणात पकडलेल्या गेलेल्या ट्रॉलरचे मालक, गोव्याचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना तेथील तहसीलदारांनी ३ लाख रुपये दंड ठोठावला असून ट्रॉलरचा परवाना रद्द केला आहे. हा ट्रॉलर जप्त करण्यात आला आहे. मालवणच्या तहसीलदारांनी नोटिस बजावून सिल्वेरा यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. १९८१ च्या महाराष्ट्र सागरी मच्छिमारी कायद्यानुसार तहसीलदारांनी ही नोटीस त्यांना बजावली होती. परंतु सिल्वेरा हे सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत. 

मालवणच्या गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी मालवणमध्ये हा ट्रॉलर पकडला होता. त्यानंतर हा ट्रॉलर गोव्यातील सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. एलईडी दिवे वापरून मासेमारी करण्यास देशभरात बंदी आहे. असे असतानाही या ट्रॉलरव्दारे एलईडीचा वापर करून मासेमारी केली जात होती. ट्रॉलरवर सुमारे ६0 हजार रुपये किमतीची मासळी होती ती जप्त करुन तेथील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी नंतर हे प्रकरण महसूल खात्याकडे पाठवले. 

दरम्यान, गोव्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार सिल्वेरा यांचा ट्रॉलर पकडला गेला आणि आता त्यांना दंडही ठोठावण्यात आला ही सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट असल्याचे म्हटले आहे. आमदार सिल्वेरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :goaगोवाMLAआमदारsindhudurgसिंधुदुर्ग