शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा?
2
30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...
4
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
5
Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट
6
संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा
7
Life Lesson: तुम्हाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या, लोकांकडे किडा समजून दुर्लक्ष करा!- सद्गुरू
8
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
9
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती
10
८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 
11
Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
12
अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?
13
शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन
14
"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!
15
रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?
16
राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!
17
टाटा मोटर्स आणणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही; जाणून घ्या Curvv, Harrier आणि Sierra EV ची लाँच टाइमलाइन 
18
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
19
USA vs IND : "भारत मजबूत संघ असला तरी...", अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 
20
Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!

गोवा खाण घोटाळा - इम्रान खानने पुढे केली धर्माची ढाल, न्यायालयाकडून आक्षेप व तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 8:49 PM

पणजी- कोट्यवधी रुपयांच्या खनिज चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला बेकायदेशीर ट्रेडर इम्रान खानला आता आपला धर्म आठवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आपला बचाव करताना त्याच्या वकिलाकडून आपण अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा युक्तिवाद केला. परंतु खंडपीठाने त्याच्या या दाव्याला जोरदार अक्षेप घेताना कडक समज दिली. कोणत्याही प्राधिकारणाकडून ...

पणजी- कोट्यवधी रुपयांच्या खनिज चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला बेकायदेशीर ट्रेडर इम्रान खानला आता आपला धर्म आठवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आपला बचाव करताना त्याच्या वकिलाकडून आपण अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा युक्तिवाद केला. परंतु खंडपीठाने त्याच्या या दाव्याला जोरदार अक्षेप घेताना कडक समज दिली. 

कोणत्याही प्राधिकारणाकडून कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दाखला न घेता बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन आणि निर्यात करून सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या इम्रान खानने आता संरक्षणासाठी आपल्या धर्माची ढाल पुढे करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खानला सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटीने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना त्याच्या वकिलाकडून हा दावा करण्यात अला. इम्रानने कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. एसआयटीला हवी असलेली सर्व माहिती त्याने दिलेली असताना केवळ अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळेच त्याला  एसआयटीकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला.  याला एसआयटीचे वकील संतोष रिवणकर यांनी जोरदार अक्षेप घेतलाच, शिवाय न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनीही कडक आाक्षेप घेऊन समज दिली. या प्रकरणाशी असंबंधीत मुद्दे न्यायालयात उपस्थित न करण्याचा इशाराही देण्यात आला. 

कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात एसआयटीने चौकशीचे पाश आवळल्यामुळे या प्रकरणात अडकलेल्या ट्रेडर्सची, खाण मालक आणि काही खाण अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे. एसआयटीकडून अटक करण्यात आलेल्या सर्व ट्रेडरपैकी इम्रान खान हा सर्वात मोठी लूट करणारा ठरला. त्याच्या बँकेत १०० कोटीहून अधिक रुपयांच्या कायम ठेवीही एसआयटीला आढळल्या आणि त्यातील ७० कोटी रुपयांच्या ठेवी एसआयटीकडून गोठविण्यातही आल्या आहेत. 

अटक करण्यात आल्यानंतर इम्रान खानला पणजी सत्र न्यायालयाकडून केवळ दोन दिवसात सुटका करण्यात आली. याच गुन्ह्यासाठी अटक करण्यात आलेला पिटर जेकब याला २३ दिवस तुरुंगात रहावे लागले होते. कांचा गौंडरला १९ दिवस तर खाण अधिकारी रामनाथ  शेटगावकर यांना ५ दिवस तुरूंगात रहवे लागले होते. परंतु सर्वात अधिक कारनामे करण्याचा ठपका असलेला तसेच अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या इम्रानला मात्र केवळ २ दिवसांनीच जामीनवर सोडण्यात आले होते. तसेच त्यांच्या भावांनाही अटकपूर्व जामीन अर्जानंतर अंतरिम जामीन देण्यात अला. असे असतानाही धर्माची ढाल पुढे करण्याची हरकत इम्रानतर्फे करण्यात आली.