लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:53 IST2025-05-22T09:52:22+5:302025-05-22T09:53:34+5:30

वर्धापनदिनी 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव

goa lokmat emphasized on truthful political news said cm pramod sawant | लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'लोकमत'ने गेली १६ वर्षे 'पत्रकारिता परमो धर्म' या तत्त्वावर काम करत राज्यात आपला यशस्वी पाया रोवला. केवळ शहरी बातम्यांवरच नव्हे तर ग्रामीण भागातील बातम्या आणि सत्यशोधक बातम्या देण्यावर लोकमतने भर दिला. खासकरून लोकमतच्या राजकीय बातम्या नेहमीच सत्य असतात. लोकमतची ही यशस्वी वाटचाल अशी सुरूच राहो. यासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये बुधवारी 'लोकमत'चा १६ वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण्यांचे फोटो सगळेच छापतात; पण सामान्य लोकांचे, कष्टकरी लोकांच्या दैनंदिन कामांचे फोटोही लोकमत छापतेत हे कौतुकास्पद आहे. राज्यातील साहित्यिकांना लोकमतने स्थान दिले. सखी मंचच्या माध्यमातून आणि सामाजिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून सामाजिक कार्य वाढविले. वृत्तपत्रांनी गोवा प्रथम तत्त्वावर राज्याचे हित पाहावे.

लोकमतने अव्वल दर्जा राखून ठेवला : दामू नाईक

स्पर्धक वृत्तपत्रे असताना अव्वल दर्जा राखणे खूप कठीण आहे. मात्र, लोकमतने आपला दर्जा वाढविला आहे. डिजिटल बुलेटिनसोबत चांगले वृत्तपत्र लोकांना देण्याचे काम लोकमतने केले आहे. या १६ वर्षाच्या विश्वासाच्या वाटचालीत संपादक, सव्यवस्थापक यांच्यासोबत सर्वच कर्मचान्यांची मेहनत दिसून येते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

गावागावांत पोहोचला लोकमत : सदानंद तानावडे

लोकमत राष्ट्रीय मराठी वृत्तपत्र म्हणून नावरूपास आले आहे. इतर वृत्तपत्रे वाचली तरी लोकमत वाचले नाही तर वृत्तपत्र वाचल्यासारखे वाटत नाही. संपादकीय आणि कुजबुज या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. संपादकीयसाठी तर आम्ही आठ दिवस वाट पाहत असतो, असे उद्‌गार खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले.

'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षांव!

'लोकमत'चा १५ वा वर्धापन दिन काल, बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, उद्योग, साहित्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

दोनापावल येथील दि इंटरनॅशनल सेंटर येथे स्नेहमेळावा झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. गणेश गावकर, केदार नाईक, दिगंबर कामत, विजय सरदेसाई, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो, राज्य संघचालक राजेंद्र भोबे, उद्योजक अनिल खंवटे, माजी संघचालक सुभाष वेलिंगकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, राज्य काँग्रेस प्रभारी अंजली निंबाळकर, श्रीनिवास खलप, वीरेंद्र शिरोडकर, राजन घाटे, माजी आमदार नरेश सावळ, दिलीप परुळेकर, म्हापसा उपनगराध्यक्ष प्रकाश भितशेट, दक्षिण गोता खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, महेश नाडर, पर्यटन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, काँग्रेस सरचिटणीस विजय भिके, उत्पल पर्रीकर, डॉ. राजीत कामत, माजी उपमहापौर यतीन पारेख, सामाजिक कार्यकर्ते आप्पा शेट तानावडे, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप, उपसंचालक मिलिंद भाटे, गायिका शकुंतला भरणे, आपचे राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर, मधु नाईक, नगरसेवक जॉएल आंद्रद, सिसील रॉडिग्ज, फ्रांसिस्को कुएल्हो, हों फर्नाडिस, नाटचकर्मी देवीदास आमोणकर, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी, डॉ. रूपा चारी, गोवा विद्यापाठीचे डॉ. प्रकाश पर्येकर, एम. व्ही. नाईक, आत्माराम गावकर, सूर्यकांत गावस, गोविंद पर्वतकर, शांताराम नाईक, सर्वानंद भगत, देवानंद नाईक, अशोक नाईक उपस्थित होते.

 

Web Title: goa lokmat emphasized on truthful political news said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.