शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही - बाबू आजगांवकर

By किशोर कुबल | Updated: April 29, 2024 13:48 IST

Goa Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला.

- किशोर कुबल पणजी -  इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला.

पत्रकार परिषदेत आजगांवकर यांनी विरियातो यांचा कडक शब्दात निषेध केला. ते म्हणाले कि, ‘ गोवा मुक्तिनंतर राज्य घटना गोवेकरांवर लादली गेल्याचे विरियातो यांचे विधान संतापजनक आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आदी सर्वचजण त्यांच्या या विधानामुळे दुखावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या घटनेवर बोलण्याचा तसेच ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.’

आजगांवकर म्हणाले कि,‘आज घटनेमुळे लोकशाही आहे आणि जगभरात भारतातील लोकशाहीचे कौतुक आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आम्ही आमदार बनू शकलो. मी चार वेळा आमदार बनलो. पेडणे मतदारसंघात मुक्तीनंतरही पाणी, वीज, रस्ते नव्हते. आमदार व मंत्री बनून पेडणेचा विकास केला. पत्रकार परिषदेस प्रदेश भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष सिध्देश पेडणेकर, सरचिटणीस दत्ताराम पेडणेकर व विद्याधर आर्लेकर उपस्थित होते.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४