स्थानिक शेतकरी बनले आत्मनिर्भर, वर्षभरात फलोत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांची १,०५१ टन भाजी खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 15:36 IST2023-12-29T15:36:09+5:302023-12-29T15:36:41+5:30
Goa News: यंदाच्या २०२३ या वर्षी राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात भाजीची लागवड केली होती. गोवा फलोत्पादन मंडळाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांकडून १०५१.७७ टन भाजीपाला खरेदी करण्यात आला.

स्थानिक शेतकरी बनले आत्मनिर्भर, वर्षभरात फलोत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांची १,०५१ टन भाजी खरेदी
- नारायण गावस
पणजी - यंदाच्या २०२३ या वर्षी राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात भाजीची लागवड केली होती. गोवा फलोत्पादन मंडळाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांकडून १०५१.७७ टन भाजीपाला खरेदी करण्यात आला, ज्याची किंमत रु. ३ कोटी ८४ लाख एवढी आहे. एकूण ८९७ शेतकऱ्यांना हा फायदा झालेला आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे वळवत आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. स्थानिक शेतकऱ्ंयांना भाजीपाला लागवडीला चालना देण्यासाठी आणि भाजीपाल्यासाठी इतर राज्यांवरील अवलंबन कमी करण्यासाठी ही लागवड क्षेत्र वाढविले आहे. माेठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात विकास हाेत आहे. त्यामुळे बेळगाव, काेल्हापूर इतर ठिकाणावरुन आयात केली जाणारी भाजी कमी करण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न आहे.
८९७ शेतकऱ्यांनी घेतला ३.८४ कोटींचा फायदा
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली भाजी फलोत्पादन मंडळाला विक्री करुन मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी भेंडी, मिरची, दुधी, काकडी, वांगी यासारखी भाजी मोठ्याप्रमाणात उत्पादीत करत आहेत. यामुळे ही भाजी फलोत्पादन मंडळाला दिली जाते. राज्यातील काकडी तसेच भेंडी, मिरची यांचे उत्पादन माेठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही भाजी गाेव्यातून परराज्यातही निर्यात केली जाते. त्यामुळे राज्यात भाजी लागवड खूपच वाढले आहे.
फलोत्पादन मंडळाकडून प्रोत्साहन
राज्यात फलाेत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाजी लागवडीसाठी प्राेत्साहन दिले जात आहे. लागवड क्षेत्र वाढल्याने अनेक लाेकांना मोठा प्रमाणात फायदाही झालेला आहे. त्यामुळे जास्त शेतकरी आता भाजी लागवड करत आहेत. फलाेत्पादन मंडळाकडून त्यांना याेग्य तो दरही दिला जातो. या तसेच त्यांना योग्य प्रशिक्षणही कृषी खात्याकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भाजीपाल्याच्या लागवडीत माेठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, असे फलाेत्पादन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.