दिल्लीवाल्यांसाठीच गोव्यातील दारूच्या किंमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:41 PM2020-03-03T22:41:04+5:302020-03-03T22:41:16+5:30

सरदेसाई यांचा आरोप : पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त

Goa liquor price hike for Delhi people only | दिल्लीवाल्यांसाठीच गोव्यातील दारूच्या किंमतीत वाढ

दिल्लीवाल्यांसाठीच गोव्यातील दारूच्या किंमतीत वाढ

Next

मडगाव: अबकारी करात गोव्यात जी भरमसाठ वाढ केली आहे त्यामुळे दारूची किम्मत वाढून गोव्याच्या पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होणार असून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. दिल्लीच्या काही जणांना फाईदा व्हावा म्हणून गोवा सरकार गोव्याच्या पर्यटनाचा बळी देऊ पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.


गोव्यात सध्या विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, अश्या परिस्तितीत देशी पर्यटकही कमी झाले तर या व्यवसाईकांना धंदाच मिळणार नाही. गोव्यात स्वस्त आणि चांगली दारू मिळते यासाठीच देशी पर्यटक येतात. त्यात प्रामुख्याने दिल्लीच्या पर्यटकांचा समावेश असतो . सध्या अबकारी करात जी वाढ झाली आहे त्यामुळे गोव्यातील दारूची किम्मत दिल्लीत मिळणार्‍या दारू एवढी झाली आहे. जर दिल्लीत ज्या किमतीत दारू मिळते त्याच किमतीत गोव्यात ती मिळत असेल तर हे पर्यटक गोव्यात का येतील असा सवाल त्यांनी केला.


ते म्हणाले गोव्यातील पर्यटन व्यवसायात जे कोण आहेत ते भाजपचे समर्थक नाहीत म्हणूनच हा त्यांच्यावर केलेला आन्याय आहे. जर ही दरवाढ मागे घेतली नाही तर जिल्हा पंचायत निवडणुकीत त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी काजू फेणीवर वाढविलेला कर मागे घेणार अशी घोषणा केली होती. पण तशी अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. हे सरकार सध्या लोकांच्याही विरोधात आहे का असा सवाल त्यांनी केला.


९०० मीटर गटार वाहिनीचे काम फेल
सरदेसाई यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाउसकर यांच्याशी चर्चा केली असतं प्रेझेंटेशन कान्वेंट ते कदंबा बस स्थानक दरम्यानाचे काम व्यवस्थित न झाल्याने आता ते पुन्हा करावे लागणार हे स्पष्ट झाले. १३० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प हाती घेतला होता. यामुळे आता हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. या भागात गटार वाहिनी नसल्याने सांडपाणी सरळशेतात सोडून दिले जाते. हे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली. रस्ता रुंदीकरण , डोंगरवाडा येथे बांधण्यात येणार्‍या जळकुंभाचे कामही लवकर पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. 

Web Title: Goa liquor price hike for Delhi people only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.