शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 19:28 IST

गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही.

पणजी : गोवा मुक्तीसाठी विलंब होण्याचे कारण हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असल्याचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.  

चौहान म्हणाले, ‘भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यांतच राहिला. गोमंतकीय स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही’.  जी नीती गोव्याच्या बाबतीत वापरली तीच नीती नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत वापरली असे चौहान यांनी सांगितले. राजा हरिसंग यांनी काश्मीर भारतात सामाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही ३७० कलमांतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मीर कायमचे लटकत ठेवण्यात आले. तसेच पाकिस्तानी काश्मीरवर हल्ला केल्यानंतर आपल्या सैनिकांनी त्यांना जबरजस्त उत्तर दिल्यामुळे त्यांना पिछेहाट करावी लागली. पाकीस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आपले लष्कर पुन्हा मिळविण्याच्या मार्गावर असताना संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युद्धबंदी करण्याची घाई नेहरूंनी केली. ही नीती देश विघटीत करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. 

जे कॉंग्रेसला ७० वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ४८ तासात करून दाखविले आणि काश्मीरला लागू करण्यात आलेले ३७० कलम रद्द करून टाकले. या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी स्वागत केले असले तरी या मुद्यावर नेमकी कोणती भुमिका घ्यावी या बाबत कॉंग्रेस गोंधळात आहे. कॉंग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्त्व्ये या मुद्द्यावर करीत आहेतकॉंग्रेसने कलम ३७० मुद्द्यावर आपली भुमिका स्पष्ट करावी. पराभवानंतर अध्यक्षपदा सोडणाऱ्या  राहूल गांधी यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, परंतु कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या संबंधी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राहूल गांधी यांचा उल्लेख त्यांनी ‘रणछोडदास’ असा केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपा