शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ७८.९४ टक्के मतदान; प्रस्थापितांच्या बाबतीत धक्कादायक निकालाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 22:27 IST

सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.

पणजी : गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान झाले. ७८.९४ टक्के मतदान झाले असून मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसला. सरकारविरुध्द कौल जाऊन काही मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांच्या बाबतीतही धक्कादायक निकाल लागू शकतात. नवे चेहरे विधानसभेत येण्याची शक्यता असून १० मार्च रोजी मतमोजणीअंती चित्र स्पष्ट होईल.

सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक केंद्रांवर सकाळीच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या यात महिला मतदारांचा समावेश होता. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. डिचोली, शिवोली, म्हापसा, ताळगाव, कुंभारजुवें, सांताक्रुज, सांत आंद्रे, सांगे, मयें, कुडतरी, बाणावली आदी मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांची दमछाक झाली. बदलाचे वारे असल्याने धक्कादायक निकाल येऊ शकतात.

महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, सभापती राजेश पाटणेकर, आमदार ग्लेन तिकलो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आदी भाजप उमेदवार तसेच तृणमूलचे बाणावलीचे उमेदवार चर्चिल आलेमांव यांच्यासाठी निकाल धक्कादायक ठरु शकतात.

साखळीत सर्वाधिक ८९.६४ टक्के-

उत्तर गोव्यात ७९.८४ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८.१५ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात सर्वाधिक ८९.६४ टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी ७०.०२ टक्के मतदान बाणावली मतदारसंघात झाले आहे. आचारसंहिता भंगाची चार प्रकरणे नोंद झाली.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस