शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

गोव्याच्या राज्यपालांची मेघालयात बदली; भगतसिंह कोश्यारींकडे अतिरिक्त पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:17 IST

मुख्यमंत्र्यांसोबतचा संघर्ष भोवला

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या काही निर्णयांवर जाहीरपणो टीका करून मुख्यमंत्र्यांशी संघर्ष केलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांची अखेर मंगळवारी गोव्याहून बदली झाली आहे. मलिक हे अनेक सामाजिक विषयांवरून गोमंतकीयांच्या आदरास पात्र ठरले. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांविरूद्धचा संघर्ष भोवला. त्यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जारी झाला.

सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मिरहून गोव्यात पाठविले गेले होते. ते सक्रिय राज्यपाल होते. त्यांची नियुक्ती राज्यपाल म्हणून मेघालयाला करण्यात आली आहे. तूर्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त ताबा सोपविला गेला आहे.25 ऑक्टोबर 2019 रोजी सत्यपाल मलिक यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी काबो राजनिवासाकडेच आणखी एक नवे राजभवन बांधण्याची घोषणा अलिकडेच केल्यानंतर राज्यपाल मलिक यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला होता.

गोवा अगोदरच आर्थिक अडचणीत आहे व अशावेळी कोविड व्यवस्थापनावरच व राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावरच सरकारने पूर्ण लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला राज्यपालांनी दिला होता. नवे राजभवन सध्या बांधण्याची गरज नाही. नवे राजभवन बांधण्याची घोषणा अविचारी पद्धतीची आहे असे राज्यपाल म्हणाले होते. तत्पूर्वी गोवा सरकार कोविड व्यवस्थापनात कमी पडत असल्याचेही निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले होते. आपण मिडियाच्या विरोधात जे काही बोललोच नाही ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या तोंडी घातले व मिडियाला सांगितले असाही आक्षेप राज्यपालांनी घेऊन मुख्यमंत्री सावंत यांच्यावर अत्यंत कडक टीका केली होती. मुख्यमंत्री व भाजप त्यामुळे खूप नाराज झाला होता.

राज्यपालांची गोव्याहून बदली करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे वृत्त केवळ लोकमतनेच त्यावेळी पहिल्या पानावर दिले होते. राज्यपालांना मध्य प्रदेशला बदलीवर पाठवण्याचा अगोदर केंद्राचा विचार होता. तथापि, त्यांना आता मेघालयाला पाठवले गेले आहे. राज्यपाल मलिक यांना गोव्यातील विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा भेटत होते. विरोधकांनी व गोव्यातील विविध समाज घटकांनी राज्यपालांचे कौतुक चालविले होते. तथापि, सरकार दिल्लीला तक्रारी करत होते व त्यामुळे मलिक यांची बदली झाली आहे.

गेल्या 15 रोजी स्वातंत्र्य दिनी राज्यपाल मलिक यांनी राजभवनवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्यावेळी राज्यपालांना शेवटचे भेटले होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्र