Goa: सोने चोरी प्रकरण: आणखीन दोघांना सांगलीत पकडले, कार जप्त
By सूरज.नाईकपवार | Updated: July 14, 2023 10:49 IST2023-07-14T10:48:54+5:302023-07-14T10:49:19+5:30
Gold theft case: धावत्या रेल्वेतून सोने चोरी प्रकरणात गोव्याच्या काेकण रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्रातील सांगली येथे अतुल कांबळे (३९) व महेंद्र उर्फ महेश माने (३०) या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Goa: सोने चोरी प्रकरण: आणखीन दोघांना सांगलीत पकडले, कार जप्त
- सूरज नाईक पवार
मडगाव - धावत्या रेल्वेतून सोने चोरी प्रकरणात गोव्याच्या काेकण रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्रातील सांगली येथे अतुल कांबळे (३९) व महेंद्र उर्फ महेश माने (३०) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. सोने नेण्यासाठी वापरलेली महिंद्रा लोगन कारही जप्त करण्यात आली आहे. संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत या चोरी प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
२ मे रोजी काणकोण येथे क्राँसिगसाठी रेल्वे थांबली असता, चोरीची घटना घडली होती.केरळ येथे सोने डिलिव्हरीसाठी जाणाऱ्या अशोक पाटील यांची बॅग चोरुन नेली होती. बॅगेत चार कोटींचे सोने होते.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन संदीप भोसले, अक्षय चिनवाल, धनपत बैड व अर्चना उर्फ अर्ची मोरे या चौकडीला अटक केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त मदतीने पोलिसांनी या संशयितांना अटक केली होती. नंतर मुंबई येथील झवेरी बाजारात विकलेले सोने जप्त केले होते. नंतर बेळगाव येथून संतोष शिरतोडे याला अटक केली होती. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गुडलर पुढील तपास करीत आहेत.