Goa: गोव्याचे मुख्यमंत्री केरळच्या दौऱ्यावर; भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या
By किशोर कुबल | Updated: February 21, 2024 14:50 IST2024-02-21T14:45:03+5:302024-02-21T14:50:41+5:30
Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली.

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री केरळच्या दौऱ्यावर; भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या
- किशोर कुबल
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली. केंद्रीय नेतृत्वाने सावंत यांच्याकडे दक्षिण भारतातील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवले आहे मंगळवारी त्यांनी तेलंगणामध्ये भाजपच्या संकल्प यात्रेत भाग घेतला. त्यानंतर ते केरळात पोचले असून कोट्टायम लोकसभा मतदारसंघातही बैठका घेतील. अलप्पुझा मतदारसंघात विविध योजनांच्या लाभार्थींची ते संवाद साधतील.
तेथून ते पुड्डुचेरीलाही जाणार आहेत.