गोवा : युवतीच्या विनयभंग, संशयित फरार; विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद
By काशिराम म्हांबरे | Updated: March 13, 2024 16:34 IST2024-03-13T16:34:20+5:302024-03-13T16:34:36+5:30
पीडित युवतीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलियांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला.

गोवा : युवतीच्या विनयभंग, संशयित फरार; विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद
कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका युवतीचा व्हिडीओ मोबाईलवर काढल्या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित नागमल वर्मा ( राहणार थिवी मूळ राजस्थान) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. संशयित सध्या फरार आहे.
ही घटना रविवार १० मार्च रोजी घडलेली. पीडित युवतीचे कुटूंब एका भाड्याच्या घरात रहात आहेत. घटनेच्या दिवशी युवती आपल्या राहत्या घरातील स्वच्छतागृहात आंघोळ करीत होती. त्यावेळी खिडकीतून एक व्यक्ती मोबाईलवरून तिचा व्हिडिओ काढीत असल्याचे आढळून आले. घडत असलेला प्रकार लक्षात येताच युवतीने आरडा ओरड केली. तेव्हा संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. धावून जाताना त्याच्या हातातील मोबाईल घटनास्थळी पडला. पडलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
युवतीचा आरडाओरड ऐकून तिचे पालक तसेच शेजारी जमा झाले. मात्र लोकांच्या तावडीत सापडण्यापूर्वीच संशयित पळून जाण्यास यशस्वी ठरला. पीडित युवतीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलियांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. तक्रारीनंतर घटनेचा तपास सुरु केला असून फरार नागमल याचा शोध सुरु करण्यात आला आहे. निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर तपास करीत आहे.