गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 05:44 IST2025-12-12T05:42:43+5:302025-12-12T05:44:24+5:30
गोवा सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने या भावांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
पणजी : बर्च बाय रोमियो लेन नाइट क्लब अग्निकांडातील फरार मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनाही गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीनंतर अवघ्या एका तासाच्या आत हे दोघे दिल्लीस्थित भाऊ फुकेत-थायलंड येथे फरार झाले होते.
गोवा सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने या भावांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
कोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
ड्रायव्हरच्या नावावरचे सिमकार्ड वापरत होते
लुथरा बंधू माजी ड्रायव्हरच्या नावावरील सिम कार्ड वापरत होते. मात्र ते ड्रायव्हरला माहिती नव्हते. क्लबचा सहमालक अजय गुप्ता यालाही अटक करण्यात आली आहे.
मुख्य सचिव, डीजीपींना नोटीस : गोवा राज्य मानवी हक्क आयोगाने गोवा सरकारला नोटीस बजावली आहे. मुख्य सचिव, डीजीपींना ६ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.