शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Goa Exit Poll 2022: गोव्यात भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट, बाजी कोण मारणार? एक्झिट पोलमधून दिसला असा कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 20:25 IST

Goa Assembly Election 2022: गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्येही तसाच कल दिसून आला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या गोव्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच रंगले होते. भाजपा, काँग्रेस आणि मगोप या प्रस्थापित पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस, आप आणि स्थानिक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्येही तसाच कल दिसून आला आहे. एक दोन अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलनी गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना २०१७ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

गोव्याबाबत टीव्ही नाईन भारतवर्ष-पोलस्ट्रेटने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला १७ ते १९ जा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ११ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये आपला १-४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना २-७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये भाजपाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष ४ जागा जिंकू शकतो. तर इतर पक्षांना ६ जागा मिळू शकतात.

दरम्यान, गोव्याबाबत इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरोने मात्र गोव्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपाला १०-ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोप आघाडीला ३-५ तर इतरांना १ ते ४ जागा मिळू शकतात  टीव्ही ९ भारत वर्ष पोलस्ट्रेटभाजपा - १७-१९ काँग्रेस - ११-१३ आप - १-४इतर - २-७टाइम्स नाऊ भाजपा १४ काँग्रेस १६ आप ४ इतर ६

 इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरोभाजपा - १०-१४काँग्रेस -२०-२५मगोप+ - ३-५इतर - १-३

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीcongressकाँग्रेसBJPभाजपा