Goa Election 2022: भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:21 AM2022-01-22T11:21:38+5:302022-01-22T11:23:02+5:30

Goa Election 2022: भाजपतून बंडखोरी केल्यानंतर नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रात उत्पल पर्रिकर यांनी नेमके काय म्हटले आहे? जाणून घ्या...

goa election 2022 utpal parrikar wrote letter to narayan rane after resign from bjp | Goa Election 2022: भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र; म्हणाले...

Goa Election 2022: भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र; म्हणाले...

Next

पणजी: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठा भूकंप झाला असून, उमेदवारी न मिळालेल्या अनेक नेते, मंत्री, आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांचा समावेश असून, भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय उत्पल पर्रिकर यांनी जाहीर केला आहे. भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे. 

उत्पल पर्रिकर पणजीतूनच विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. भाजपकडून उत्पल यांना अन्य दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र, ते त्यांना मंजूर नव्हते. अखेर भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला. उत्पल यांची बंडखोरी भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर उत्पल पर्रिकर यांनी भाजप नेते नारायण राणे यांना पत्र लिहिले आहे. 

नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलेय?

पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे. माझा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असे उत्पल पर्रिकर यांनी नारायण राणे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही, अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी याआधीच मांडली होती. 

दरम्यान, गोव्यासाठी भाजपकडून ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला असून, भाजप सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. नाराज असलेल्या बंडखोरांपैकी अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 
 

Web Title: goa election 2022 utpal parrikar wrote letter to narayan rane after resign from bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app