Goa Election 2022: “अन्य कुठलेही पर्याय नको, निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच”; उत्पल पर्रिकर भूमिकेवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:27 PM2022-01-20T15:27:55+5:302022-01-20T15:28:20+5:30

Goa Election 2022: भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

goa election 2022 utpal parrikar clears that no other options are acceptable i will contest election only from panjim | Goa Election 2022: “अन्य कुठलेही पर्याय नको, निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच”; उत्पल पर्रिकर भूमिकेवर ठाम

Goa Election 2022: “अन्य कुठलेही पर्याय नको, निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच”; उत्पल पर्रिकर भूमिकेवर ठाम

Next

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) भाजपने आपली पहिली ३४ उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrika) यांना भाजपने पणती मतदारसंघातून उमेदवारी नाकरली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभेसाठी केवळ पणजीतूनच निवडणूक लढवणार असून, अन्य पर्याय नको, अशी ठाम भूमिका उत्पल पर्रिकर यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

पणजी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असे वाटते की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, पणजीतूनच निवडणूक लढण्यावर उत्पल पर्रिकर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

माझी भूमिका स्पष्ट, निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच

गोवा विधानसभेची निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच लढवणार. डिचोली किंवा अन्य कोणत्याही जागेवरून आपला निवडणूक लढवण्याचा विचार नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. यापुढे माझा निर्णय काय असेल, ते लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे, हे नक्की, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. आताच्या घडीला उत्पल पर्रिकर नेमके कुठे आहेत, हे कोणालाही माहिती नाही. मात्र, दूरध्वनी ते संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. 

उत्पल पर्रिकर पणजीसाठी सक्षम उमेदवार

उत्पल पर्रिकर आणि त्यांच्या समर्थकांनी पणजीतून प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल स्वतः घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. मनोहर पर्रिकर यांचे जुने सहकारीही उत्पल यांच्यासोबत आहेत. त्यांचेही मत आहे की, उत्पल पर्रिकर हे पणजीतून निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पणजीतूनच उमेदवारी देण्यात यावी, यावर तेही ठाम आहेत. तत्पूर्वी, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. 

दरम्यान, भाजपने गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: goa election 2022 utpal parrikar clears that no other options are acceptable i will contest election only from panjim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app