शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 5:57 PM

Goa Election 2022: काँग्रेसच्या ढोंगीपणाचा पर्दापाश करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिषेक बॅनर्जींनी गोव्यात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी:तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या लोकांच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर टीकास्त्र सोडले.गोवा'टीएमसी'चे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि गोवा टीएमसी महिला उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.

त्यांच्या सुरुवातीच्या विधानात, अभिषेक बॅनर्जी यांनी 'टीएमसी' विरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला, ज्यामुळे भाजपला फायदा होत आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘एआयटीसी'च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व समविचारी पक्षांना (भाजपविरोधी शक्तींना) गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. 'टीएमसी' मार्गाबाहेर गेली आणि स्वतःहून सर्वांपर्यंत पोहोचली. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तर इतरांनी प्रतिसाद दिला नाही.आपल्या शब्दांनी सडेतोड उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये गेलो असतो. पण आम्ही कुठे गेलो? आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजपचे सरकार असलेल्या गोव्यात आलो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना 'एआयटीसी'चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, ‘ चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहे. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला तथ्ये सांगायची आहेत. 'AITC' चे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोमंतकीयांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले. पण स्वत:च्या क्षुल्लक उद्दिष्टांच्या वरती जाण्यात ते अपयशी ठरले. 

ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची भाजपसोबत अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे. आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी 'टीएमसी' का सोडली याबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाले, ‘ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचे आहे, ते सोडून जाऊ शकतात.

पुढे, लुइझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता,अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ‘कोणतीही नाराजी नाही. तिकीट मिळाल्यावर कोणी नाराज झाल्याचे मी कधी ऐकले नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो हे एक सैनिक आहेत आणि ते विश्वासघातकी -इन-चीफ (विजय सरदेसाई) विरुद्ध लढणार आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी