शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Goa Election 2022: “निर्णायक मतदान झालेय, सत्ताधाऱ्यांविरोधी नाराजीच्या लाटेने गोव्यात भाजपचे पानिपत नक्की”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:04 IST

Goa Election 2022: सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून, काँग्रेसलाच गोव्यात बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

पणजी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात यंदाची विधासभेची (Goa Election 2022) निवडणूक चांगलीच रंगली. १४ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने आता गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलणार की राज्यात सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यातच आता गोव्यात निर्णायक मतदान झाले आहे. याचा फायदा काँग्रेसलाच मिळणार असून, भाजपचे पानिपत नक्की आहे, असा दावा करण्यात आला आहे. 

निर्णायक मत देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे आले असून त्याची प्रचिती निकालात दिसून येईल. सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. मला वाटते की, काँग्रेससाठी हा चांगला निकाल असणार असून बहुमत मिळेल. तळागाळाला काम कऱणारे आमचे लोकही हेच सांगत आहे, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली मते व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट

मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट दिसत आहे. आपण निवडणुकीत पराभूत होणार हे माहिती असल्यानेच ते दारोदारी जाऊन प्रचार करत होते. त्यांच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होणे आमच्यासाठी चांगले आहे. आमचा उमेदवार विजयी होईल. गोव्यातील लोकांना स्थिर सरकार हवे असून बहुमताने सरकार निवडून आणायचे आहे. राज्यातील आयाराम गयाराम राजकारण त्यांना बदलायचे असून एक शांत वादळ निर्माण होत होते. आम्हाला २० पेक्षा जास्त जागा मिळतील आणि भाजपा एक आकडी संख्याही पार करुन शकणार नाही, असा दावा राव यांनी केला. 

दरम्यान, गोव्यामधील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोव्यामध्ये ७८ टक्के मतदान झाले. तर उत्तर गोव्यामध्ये ७९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ८९.६१ टक्के मतदान हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले. गोव्यात सर्वात कमी ७०.२ टक्के मतदान हे बाणेली मतदारसंघात झाले. या मोठ्या प्रमाणावरील मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण