गोव्यातील डिस्ट्रिलरी संचालक व वाईनशॉप मालकाला गुजरातमध्ये अटक
By वासुदेव.पागी | Updated: March 21, 2024 16:50 IST2024-03-21T16:50:13+5:302024-03-21T16:50:26+5:30
वाईन शॉपचे मालक फ्रान्सिस डिएगो मायकल डिसोझा आणि डिस्टिलरीचे संचालक मनीष मिश्रा यांना अटक केली आहे.

गोव्यातील डिस्ट्रिलरी संचालक व वाईनशॉप मालकाला गुजरातमध्ये अटक
पणजी : गोव्यातील एका डिस्टिलरीच्या संचालकासह वाईन शॉपच्या मालकाला ५०.४० लाख रुपयांच्या दारू तस्करीप्रकरणी गुजरात क्राईम ब्रॅंचने नवसारी-गुजरातमध्ये अटक केली आहे.
मंगळवार, 19 मार्च रोजी गुजरात एलसीबीच्या पथकाने गोव्यातील वाईन शॉपचे मालक फ्रान्सिस डिएगो मायकल डिसोझा आणि डिस्टिलरीचे संचालक मनीष मिश्रा यांना अटक केली आहे. त्याला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्यातून गुजरातमध्ये दारूची तस्करी करणारा ट्रकचालक विक्रम भिल्ल यालाही अटक करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार र्वाइन शॉपचे मालक डिसूझा यांनी डिस्टिलरी संचालक मिश्रा यांच्याकडून माल खरेदी केला होता. त्यानंतर हा माल राजस्थानस्थित सुरेश बिश्नोई यांना विकण्यात आला होता. नंतर बिष्णोईने गोध्रा येथील रमेश वनकर यांच्या ट्रकमधून माल पाठविला. मात्र हि माहिती गुजरातच्या स्टेट मॉनिटरिंग सेलच्या पथकाला मिळाल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या सेलने हा ट्रक पकडून माल जप्त केला.